...म्हणून दीपिका रणवीर यांचा हनिमून काळ असणार कमी

आता तर त्यांच्या हनिमूनला घेऊन गॉसीप सुरू झालयं. 

Updated: Oct 23, 2018, 12:07 PM IST
...म्हणून दीपिका रणवीर यांचा हनिमून काळ असणार कमी title=

मुंबई : दीपिका पादुकोण आणि रणवीर कपूर यांच्या लग्नाची बातमी वाऱ्यासारखी पसरलीय. दीपिकाने सोशल मीडिया अकाऊंटवरून लग्नाची पत्रिका शेअर केल्यापासून उभयतांवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. या दोघांच्या लग्नाचीच चर्चा सगळीकडे पाहायला मिळतेय. दोघे लग्न कुठे करणार ? दीपिका कोणता ड्रेस घालणार ? लग्नाच आमंत्रण किती जणांना देणार ? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. आता तर त्यांच्या हनिमूनला घेऊन गॉसीप सुरू झालयं.

वर्क कमिटमेंट्स 

दीपिका आणि रणवीर जास्त दिवस हनिमूनला जाऊ शकणार नाहीत, असं आता सांगितलं जातंय. यामागे कारणंही तसंच आहे.

या दोघांची व्यावसायिक करार याला कारणीभूत आहेत. 'मुंबई मिरर' ने यासंदर्भातील वृत्त दिलंय. रणवीर सध्या रोहित शेट्टीच्या 'सांबा' सिनेमाची शूटींग करतोय.

सांबा सिनेमा डिसेंबरमध्ये रिलीज होणार आहे. दीपिकाने देखील मेघना गुलजारचा आगामी सिनेमा करायचं ठरवलंय.

त्यामुळे या दोघांचा हानीमून काळ खूप कमी असणार असल्याचं म्हटलं जातंय. 

दीपिका आणि रणबीर इटलीतील लेक कोमोमध्ये लग्न करणार आहेत.

या ठिकाणच्या नैसर्गिक सौंदर्यामुळे दोघांनी हे ठिकाण निवडलंय.

तसेच मुंबई आणि बंगळूरुमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दोघे रिसेप्शन ठेवणार आहेत.