Dilip Joshi Gets into Fight With Producer Asit Modi : छोट्या पडद्यावरील 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका गेल्या अनेक दिवसांपासून वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. त्याचं कारण हे मालिकेत काम करणारे कलाकार आणि निर्माते आहेत. तारक मेहता या मालिकेत जेठालाल चंपकलाल गडा ही भूमिका साकारणारा अभिनेता दिलीप जोशी आणि निर्माते असित कुमार मोदी यांच्यात सतत काही ना काही वाद होत असल्याचे पाहायला मिळते.
'न्यूज 18 'च्या रिपोर्टनुसार, दिलीप जोशी आणि असित मोदी यांच्यातील हा वाद ऑगस्टमध्ये सुरु झाला. खरंतर असं म्हटलं जातं की हा वाद हा मानधनावरून नाही तर सुट्ट्यांना घेऊन आहे. अशी माहिती मिळाली की सुट्ट्यांना घेऊन दोघांमध्ये चांगलाच वाद सुरु झाला. या शोमधील एका सुत्रानं दिलेल्या माहितीनुसार, दिलीप यांनी काही दिवसांची सुट्टी हवी होती. त्याविषयी त्यांनी असित मोदी यांना विचारलं देखील पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. यावर जेठालाल यांना ते पटलं नाही. अशी माहिती मिळाली आहे की हे सगळं हानामारीपर्यंत गेलं होतं.
एका सुत्रानं दिलेल्या माहितीनुसार, कुश शाहच्या शूटिंगचा अखेरचा दिवस होता. त्यानं म्हटलं की 'इथे दिलीप जोशी हे निर्मात्यांच्या येण्याची प्रतीक्षा करत होते आणि त्यांना त्यांच्याशी सुट्ट्यांविषयी बोलायचं होतं. पण ते आले आणि थेट कुशला भेटायला गेले. त्यावरून दिलीप हे चिडले आणि त्यांच्यात यावरून वाद देखील झाला. इतकंच नाही तर असं म्हटलं जातं की त्यांच्यात भांडण इतकं वाढलं की दिलीप यांनी थेट असित मोदी यांची कॉलर धरली आणि शो सोडण्यासाठी धमकी दिली. '
हेही वाचा : राकेश रोशन यांनी बॉलिवूडला ठोकला कायमचा रामराम! 'क्रिश 4' चा उल्लेख करत मोठी घोषणा
दरम्यानं, असं म्हटलं जातंय ती दोघांमध्ये या आधी देखील असं भांडण झालं होतं. शोचं जेव्हा हॉंगकॉंगमध्ये शूट होतं त्या दरम्यान देखील त्यांच्यात मोठं भांडण झालं होतं. पण त्यात गुरुचरण सिंग सोढी यांनी त्या दोघांची समजूत काढली. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका गेल्या 16 वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. दिलीप जोशी या मालिकेत पहिल्या एपिसोडपासून आहेत. तर या मालिकेतील अनेक महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या कलाकारांनी ही मालिका सोडली.