"काली रिलीज हो रहा है"; 'Kantara' नंतर आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

या चित्रपटाचा टीझर आतापर्यंत जवळपास 77 लाख लोकांनी पाहिलाय

Updated: Oct 22, 2022, 01:18 PM IST
"काली रिलीज हो रहा है"; 'Kantara' नंतर आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला title=
(फोटो सौजन्य - YouTube)

केजीएफ (KGF 2) आणि कांतारा (Kantara) नंतर आणखी एक कन्नड चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासाठी येत आहे. केडी- द डेव्हिल (KD- The Devil) असे या चित्रपटाचे नाव आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर हिंदीतही प्रदर्शित झालाय. चाहत्यांनाही या टीझरला चांगला प्रतिसाद दिलाय. वास्तविक घटनांनी प्रेरित असलेला हा चित्रपट तुम्हाला केजीएफच्या जवळ घेऊन जाणारा आहे. त्यामुळे आता यशच्या चित्रपटाला जे यश मिळालं त्याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. या चित्रपटात संजय दत्तही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

या चित्रपटाच्या टीझरमध्ये बंगळुरूमधील (bangalore) दृश्य दाखवण्यात आला आहे. एक गुन्हेगार अनेक वर्षांनंतर तुरुंगातून बाहेर येत असतो. त्याच्यासाठी संपूर्ण शहर हाय अलर्टवर आहे. कारण त्या गुन्हेगाराला हजारो शत्रू असतात. तुरुंगातून बाहेर पडताच त्यांना त्याला संपवायचे आहे. दुसरीकडे मोठ्या प्रमाणात त्याचे चाहतेही आहेत. तुरुंगाबाहेर उभे असलेल्या चाहत्यांनी त्याच्या स्वागतासाठी मशाल पेटवली. मात्र मागच्या गेटमधून बाहेर आल्यानंतर त्याने मारहाण करण्यास सुरुवात केली आहे. 'कालिदास' असे या गुन्हेगाराचे नाव आहे. त्यामुळे चित्रपटाचे नाव के.डी. असं आहे. कन्नड (kannada) भाषेत के.डी. म्हणजे चालू असा आहे.

केडीच्या (KD- The Devil) स्टारकास्टबद्दल अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण प्रत्येक सुपरस्टार्सकडून चित्रपटाला आवाज देण्यात आला आहे. विजय सेतुपती (vijay sethupathi) चित्रपटाच्या तमिळ (Tamil) आवृत्तीत सूत्रधाराची भूमिका साकारत आहे. तर मल्याळम आवृत्तीत मोहनलाल (mohanlal) यांचा आवाज आहे. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनमध्ये संजय दत्तचा आवाज ऐकायला मिळतो. या चित्रपटात त्याचीही महत्त्वाची भूमिका असल्याचे बोलले जात आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

दरम्यान, केडी- द डेव्हिलमध्ये (KD- The Devil) कन्नड चित्रपट स्टार ध्रुव सरजाने (dhruva sarja) मुख्य भूमिका साकारली आहे. दिवंगत कन्नड स्टार चिरंजीवी सरजा यांचे ते भाऊ आहेत. त्याने 2012 मध्ये 'अधुरी' या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. पुढे तो 'बहादूर', 'भर्जरी' आणि 'पोगारू' सारख्या चित्रपटात दिसला होता. प्रेम या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. प्रेमने 2003 मध्ये करिया या ब्लॉकबस्टर चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले होते. त्यानंतर त्यांनी 'एक्सक्यूज मी', 'जोगी', 'राज- शोमन' आणि 'द व्हिलन' सारखे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. केडी- द डेव्हिलच्या रिलीजची तारीख अजून समोर आलेली नाही.