Dasara ची 'भोला'ला जोरदार टक्कर, बॉक्स ऑफिसवर गल्ल्याचा आकडा पाहून व्हाल चकीत

Dasara Beat Bholaa's Box Office Collection Day 1 : Dasara हा एक दाक्षिणात्य चित्रपट आहे. या चित्रपटानं प्रदर्शित होताच प्रेक्षकांना थिएटमध्ये खेचून घेतलं आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून त्यात आणि भोलामध्ये कमालीची टक्कर सुरु आहे. तर भोला हा अजय देवगणचा चित्रपट आहे. 

Updated: Apr 1, 2023, 12:26 PM IST
Dasara ची 'भोला'ला जोरदार टक्कर, बॉक्स ऑफिसवर गल्ल्याचा आकडा पाहून व्हाल चकीत title=
(Photo Credit : Dasara Nani Twitter/ Bholaa Ajay Devgn Instagram)

Dasara Beat Bholaa's Box Office Collection Day 1 : बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा (Ajay Devgn) 'भोला' (Bholaa) हा चित्रपट 30 मार्च रोजी प्रदर्शित झाला. रामनवमीच्या शुभ मुहुर्तावर चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपट प्रदर्शित होण्याआधीपासून त्याची चांगलीच चर्चा सुरु होती. चित्रपटानं पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. यावेळी अजयच्या भोलासोबत आणखी एक चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाचं नाव 'दसरा' (Dasara) असून हा एक दाक्षिणात्य चित्रपट आहे. या तेलुगू चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक या चित्रपटाचीही प्रतिक्षा करत होते. आता प्रदर्शित झाल्यानंतर दसरानं बॉक्स ऑफिसवर जबरदस्त ओपनिंग केली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दसरानं भोला पेक्षा जास्त कमाई केली आहे. (Dasara Box Office Collection Day 1 Beat Ajay Devgn's Bholaa)

चित्रपटानं पहिल्याच दिवशी केली इतकी कमाई!

अजयच्या भोलानं पहिल्याच दिवशी जवळपास दहा कोटींची कमाई केली आहे. तर दसरा चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर डंका वाजवला आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या दिवशी तब्बल 21 कोटींचा गल्ला केल्याचं दिसतं. दसरा हा चित्रपट तेलगू, तमिळ, मल्याळम, कन्नड आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.  या चित्रपटानं सगळ्यात जास्त कमाई कोणत्या भाषेत केली असेल तर ती तेलगू भाषेत केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दसरा हा चित्रपट सगळ्यात जास्त आंध्र प्रदेश आणि तेलंगना राज्यात प्रेक्षकांनी पाहिला. या दोन्ही राज्यात चित्रपट हा सकाळी 5 वाजेपासून चित्रपटगृहात पाहायला मिळत होता. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दरम्यान, दसरा या चित्रपटात नानीसोबत अभिनेत्री कीर्ती सुरेश आणि धीक्षित शेट्टी, समुथिराकानी आणि शाइन टॉम चाको सारख्या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तर दसरा या चित्रपटाचे दिग्दर्शन श्रीकांत उडेला यांनी केले आहे. नानीचे लाखो चाहते आहेत. त्याच कारण म्हणजे नानीनं या आधी अनेक तेलगु चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 2008 मध्ये नानीचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचं नावं अष्ट चम्मा असं होतं. त्यानंतर नानी हा वे राइड, भीमिली कबड्डी जाट्टू, आला मोडालेंदी या चित्रपटांमध्ये दिसला होता. तर दसरा आधी नानी हा 2022 साली प्रदर्शित झालेल्या अडाडे सुंदरा या चित्रपटात दिसला होता. 

हेही वाचा : बापमाणूस! लेकीनं पहिल्यांदा रॅम्प वॉक केल्यानं Arjun Rampal झाला भावूक; म्हणाला, 'हे सगळं तिनं...'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दरम्यान, भोला या चित्रपटाविषयी जाणून घ्यायचे झाले तर 'भोला' या चित्रपटात अजय देवगण आणि तब्बू व्यतिरिक्त, दीपक डोबरियाल, संजय मिश्रा, अमाला पॉल आणि गजराज रावसारखे अनेक कलाकार आहेत. 'भोला' हा चित्रपट 2019 साली प्रदर्शित झालेल्या तमिळ चित्रपट 'कैथी'चा ऑफिशियल हिंदी रिमेक आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा आकडा पार केला आहे.