Chhaava Box Office Collection Day 6 : बॉक्स ऑफिसवर गेल्या आठवड्याभरापासून फक्त चर्चा आहे ती विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांच्या 'छावा' चित्रपटाची. या चित्रपटाचं बजेट होतं 130 कोटी पण छावाचं 200 कोटींचा आकडा पार करणार आहे. तर आशा अशी आहे की वर्ल्ड वाईड कलेक्शनमध्ये हा चित्रपट 300 कोटींचा आकडा पार करणार आहे.
बॉक्स ऑफिस ट्रॅकर सैकनिल्कच्या आकड्यांनुसार, छावानं सहाव्या दिवशी 32 कोटींचं कलेक्शन केलं आहे. त्यात भारतात चित्रपटाची सहाव्या दिवशी असलेली कमाई ही 197.75 कोटी झाली आहे. तर वर्ल्डवाइड आकडा हा 250 कोटींपर्यंत पोहोचला आहे. 5 दिवसाची कमाई पाहता तर पहिल्या दिवशी 33.1 कोटींची कमाई केली तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी 37 कोटींची कमाई. तिसऱ्या दिवशी 48.5 कोटी. चौथ्या दिवशी 24 कोटी होणार. तर पाचव्या दिवशी 25.25 कोटीचं कलेक्शन होणार आहे.
विकी कौशलचा हा ऐतिहासिक चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाला न फक्त सर्वसामान्य जनतेकडून तर त्यासोबत सेलिब्रिटींकडून देखील कौतुकाचा वर्षाव होत असल्याचे पाहायला मिळत आहे. तमिळ अभिनेता आणि राजकारणी सरथ कुमार यांनी छत्रपती संभाजी महाराजच्या जिवनावर आधारीत हिंदी चित्रपट ‘छावा' पाहिला. तर सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत त्यांनी टीमचं कौतुक केलं आहे. सरथ कुमार म्हणाले, 'छत्रपती शिंवाजी महाराजांच्या जयंती निमित्तानं ‘छावा' मध्ये छत्रपती संभाजी महाराजांची वीरता आणि त्यांनी दिलेल्या बलिदानाला पाहिलं. देशभक्ती, वीरता आणि स्वराज्यच्या शोधाणं स्वराज्यच्या भावनेला जागवलं आणि प्रज्वलित केलं. ‘छावा' चे निर्माते, दिग्दर्शक आणि संपूर्ण टीमला शुभेच्छा.'
दरम्यान, चित्रपटाविषयी बोलायचं झालं तर या चित्रपटात अक्षय खन्नानं मुघल राजा औरंगजेबची भूमिका साकारली. त्यानं केलेल्या अभिनयानं सगळ्यांची मने जिंकली. आशुतोष राणा सरसेनापती हंबीरराव मोहितेची भूमिका साकारली होती. तर . दिव्या दत्तानं सोयाराबाईची भूमिका साकारली. तर डायना पेंटीनं औरंगजेबची लेक जीनत-उन-निसा बेगमची भूमिका साकारली होती. लक्ष्मण उतेकरनं या चित्रपटानं दिग्दर्शन केलं आहे.