भारतीय वंशाची प्रिया सेराव 'मिस यूनिव्हर्स ऑस्ट्रेलिया'

आता पुढील स्पर्धेसाठीही ती ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व करणार आहे. 

Updated: Jun 28, 2019, 05:33 PM IST
भारतीय वंशाची प्रिया सेराव 'मिस यूनिव्हर्स ऑस्ट्रेलिया' title=

नवी दिल्ली : भारतीय वंशाच्या प्रिया सेरावने शुक्रवारी 'मिस यूनिव्हर्स ऑस्ट्रेलिया' हा किताब आपल्या नावे केला. प्रिया सेरावचे आई-वडिल मध्य-पूर्व आशियातून ऑस्ट्रेलियामध्ये आले होते. गुरुवारी मेलबर्नमध्ये पार पडलेल्या स्पर्धेत प्रिया सेरावने २६ प्रतिस्पर्धकांना मात देत 'मिस यूनिव्हर्स ऑस्ट्रेलिया' किताब जिंकला आहे.

प्रियाने हा किताब जिंकल्यानंतर 'मी अधिक विविधता पाहू इच्छिते. माझ्यासारख्या दिसणाऱ्या आणि माझ्यासारखी पार्श्वभूमी असणाऱ्यासाठी ही गोष्ट अतिशय आश्चर्यकारक असल्याचं' तिनं म्हटलंय. 

भारतीय मूल की मॉडल बनीं मिस यूनिवर्स ऑस्ट्रेलिया, प्रिया सेराव ने बढ़ाया गौरव

'मी याआधी कोणत्याही सौदर्य स्पर्धेत भाग घेतला नव्हता आणि मी कधीही मॉडेलिंगही केलं नाही. त्यामुळे माझ्यासाठी हा किताब जिंकणं अतिशय आश्चर्यकारक गोष्ट असल्याचं' प्रियाने सांगितलंय. 

२६ वर्षीय प्रिया पुढच्या वर्षी दक्षिण कोरियामध्ये होणाऱ्या 'मिस यूनिवर्स' स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व करणार आहे. 

प्रियाचा जन्म कर्नाटकातील बेलामनुमध्ये झाला. मात्र तिचं अधिकाधिक बालपण ओमान आणि दुबईमध्ये गेलं. त्यानंतर वयाच्या ११व्या वर्षी ती ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक झाली. 

प्रियानंतर पश्चिम ऑस्ट्रेलियातील बेला कासिम्बा दुसऱ्या क्रमांक तर विक्टोरियन मॅरिजाना रॅडमॅनोविक तिसऱ्या क्रमांकावर आहे.