प्रियांका-निकच्या आनंदात परिणीतीच्या 'खास' मित्राचाही सहभाग

त्याची उपस्थिती अनेक प्रश्न आणि चर्चांना वाव देत आहे

Updated: Nov 28, 2018, 04:34 PM IST
प्रियांका-निकच्या आनंदात परिणीतीच्या 'खास' मित्राचाही सहभाग  title=

मुंबई : प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या नात्याने सुरुवातीपासूनच सर्वांचं लक्ष वेधलं. आता अवघ्या काही दिवसांवरच त्यांच्या विवाहसोहळ्याचे क्षण जवळ आले आहेत. मुख्य म्हणजे पीसीच्या घरी लग्नाआधीचे विधी, पूजा वगैरेही सुरु झाली आहे. या साऱ्या वातावरणात प्रियांका आणि निकने एका सुरेख अशा प्री वेडिंग डिनरचं आयोजन केलं होतं. ज्या ठिकाणी त्यांच्या अतिशय जवळच्या व्यक्तींची उपस्थिती पाहायला मिळाली. 

सोफी टर्नर, जो जोनास, परिणीती चोप्रा, मुश्ताक शेख, सृष्टी बेहेल यांची उपस्थिती प्रियांका आणि निकचा आनंद द्विगुणित करुन गेली होती. खुद्द प्रियांकाने या खास क्षणाचा फोटोही सोशल मीडियावर पोस्ट केला. या फोटोमध्ये एक असा चेहरा दिसला ज्याचं नाव गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री परिणीती चोप्रा म्हणजेच प्रियांकाच्या बहिणीसोबतही जोडलं गेलं. 

फोटोच दिसणारा तो चेहरा होता दिग्दर्शक चरित देसाई याचा. या फोटोमध्ये चरित परिणीतीच्याच मागे  दिसत असून, आता चोप्रा कुटुंबात आणखी एका नव्या सदस्याचा प्रवेश होतो की काय, असाच अंदाज वर्तवण्यास सुरुवात झाली आहे. 

 
 
 
 

Friends.. family.. A post shared by Priyanka Chopra (@priyankachopra) on

परिणीतीने चरितसोबतच्या नात्याविषयी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. किंबहुना त्याच्यासोबतच्या नात्याविषयी बोलणं ती अनेकदा टाळतेही. पण, घरगुती कार्यक्रमांमध्ये तिच्यासाठी 'खास' असणाऱ्या व्यक्तीची उपस्थिती मात्र अनेक प्रश्न आणि चर्चांना वाव देत आहे, असं म्हणायला हरकत नाही.