'देशाचे हनुमान....', वरुण धवनचं 'ते' विधान ऐकून हसू लागले गृहमंत्री अमित शाह

वरुण धवन अनेकदा त्याच्या विनोदी उत्तरांमुळे चर्चेत असतो. अशातच आता तो अमित शाह यांच्याबद्दल केलेल्या एका विधानामुळे चर्चेत आला आहे. 

सोनेश्वर पाटील | Updated: Dec 15, 2024, 02:21 PM IST
'देशाचे हनुमान....', वरुण धवनचं 'ते' विधान ऐकून हसू लागले गृहमंत्री अमित शाह title=

Varun Dhawan On Amit Shah: बॉलिवूड अभिनेता वरुण धवन सतत सोशल मीडियावर त्याच्या विनोदी उत्तरांमुळे चर्चेत आला आहे. पण वरुणला पहिल्यांदाच प्रेक्षक बनण्याची संधी मिळाली. याच संधीचा फायदा घेताना वरुण धवन दिसला. समोर स्टेजवर उपस्थित असलेले देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना राम आणि रावण यांच्यामधील मोठा फरक असा प्रश्न वरुणने अमित शाह यांना विचारला. त्यासोबतच अभिनेत्याने गृहमंत्र्यांचे भरभरून कौतुक देखील केले. ज्यामध्ये गृहमंत्री अमित शाह हसले. 

अमित शाह 'एजेंडा आज तक 2024'च्या स्टेजवर पोहोचले होते. यावेळी बॉलिवूड अभिनेता वरुण धवन देखील तिथे उपस्थित होता. गृहमंत्री अमित शाह यांचे बोलणे एकून वरुण मंत्रमुग्ध झाला होता. अशातच वरुण धवनला त्यांना प्रश्न विचारण्याचा मोह आवरला नाही. अमित शाह यांच्या बोलण्याने प्रभावित होऊन वरुण धवनने त्यांना राम आणि रावणातील सर्वात मोठा फरक विचारला. वरुण धवनच्या प्रश्नांना उत्तर देताना अमित शाह यांनी त्यांना धर्म, अनीति आणि अहंकार याबद्दल सांगितले. 

रावणाकडून धर्म बदलण्याचा प्रयत्न 

वरुण धवनच्या प्रश्नावर अमित शाह म्हणाले, 'काही लोकांचे हित धर्मानुसार असते. ते धर्मानुसार आपली कृती ठरवतात. त्याचबरोबर काही लोक त्यांच्या आवडीनुसार धर्म बदलतात. रामाने आपले जीवन धर्माच्या व्याख्येनुसार जगले. त्याच वेळी रावणाने स्वतःच्या व्याख्येनुसार धर्म बदलण्याचा प्रयत्न केला. हा राम आणि रावणातला सर्वात मोठा फरक होता.

अमित शाह देशाचे हनुमान 

दिवस-रात्र देशाची सेवा करणारे देशाचे हनुमान असं वरुण धवनने अमित शाह यांना म्हटले. त्यानंतर अमित शाह हसले. पुढे वरुण धवन म्हणाला, 'एखादा कलाकार लक्षात ठेवलेल्या ओळीही इतक्या स्पष्टतेने बोलू शकत नाही कारण तो अशा मनाने लोकांना संबोधित करतो. एखादी व्यक्ती अशा गोष्टी तेव्हाच बोलू शकते जेव्हा त्या त्याच्या हृदयातून सरळ येतात. मी म्हणतो तुम्ही देशाचे हनुमान आहात. सध्या वरुण धवनचे हे विधान सोशल मीडियावर चर्चेत आहे.