मुंबई : बिग बॉसमध्ये जसलीनने एक सनसनी सिक्रेट शेअर केलं आहे. ती म्हणते, माझं एका फेमस सेलिब्रिटीसोबत एक खास नातं होतं. आणि महत्वाचं म्हणजे हे गुपित माझ्या आताच्या पार्टनरला माहित नाही. जसलीनचं हे विधान अतिशय धक्कादायक आहे. दीपक आणि शिवाशीषने घरातल्यांकडून थोडी चौकशी केल्यावर याचं योग्य उत्तर समोर आलं आहे.
शिवाशीषने सर्वात अगोदर बजर दाबून या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. या प्रश्नाचं उत्तर त्याने जसलीन असं दिलं आहे. बिग बॉसने याकरता शिवाशीषला एक पॉईंट देखील दिला आहे. बिग बॉसच्या घरात दीपक आणि शिवाशीष यांच्यात एक कॅप्टन्सी टास्क होत आहे. यामध्ये जो जिंकणार तो घराचा पुढचा कॅप्टन असणार आहे.
या अगोदर दीपकला विचारण्यात आलेल्या प्रश्न असा होता की, कोण 4 ते 5 वर्षाची असताना शिव्या द्यायला शिकले होते? या प्रश्नाचं उत्तर त्याने उर्वशी वानी सांगितलं होतं. यानंतर एक प्रश्न विचारण्यात आला की, माझ्या एक्स गर्लफ्रेंडने माझ्या गर्लफ्रेंडवर जळून तिच्यावर जादूटोणा केला आहे. याचं उत्तर दीपक ठाकूरने पहिलं बजर दाबून दिलं. दीपकने करणवीर बोहराचं नाव समोर केलं आहे.