मुंबई : 90 च्या दशकात करिश्मा कपूर बॉलिवूड इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींपैकी एक होती. ती कपूर घराण्याची मुलगी नक्कीच आहे पण करिश्माने फिल्मी दुनियेत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. करिश्मा केवळ सौंदर्यातच नाही तर अभिनय आणि नृत्यातही कोणापेक्षा कमी नाही. अभिनेत्रीने तिच्या शानदार कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले, ज्यामुळे करिश्मा आजही तिच्या चाहत्यांच्या हृदयावर अधिराज्य गाजवते.
अभिनेत्री तिच्या करिअरच्या शिखरावर असताना तिने उद्योगपती संजय कपूरसोबत लग्न करून चाहत्यांना धक्का दिला होता. करिश्मा चित्रपटांपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिली. संजय कपूरच्याही आधी तिच्या आयुष्यात दोन अभिनेते आले होते. पण त्या दोघांसोबत तिचे लग्न होऊ शकले नाही.
करिश्मा कपूरचे वैयक्तिक आयुष्य चाहत्यांसाठी खुल्या पुस्तकासारखे आहे. पण यात अजय देवगणची कहाणी फार कमी लोकांना माहिती आहे. एक काळ असा होता की करिश्मा आणि अजय एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते हे फार लोकांना माहित नसेल. जेव्हा करिश्मा कपूरचे करिअर बहरत होते, तेव्हा अभिनेत्री अजय देवगणच्या प्रेमात पडली होती.
दोघांनी 'सुहाग' आणि 'जिगर' सारख्या काही चित्रपटात एकत्र काम केले. यादरम्यान दोघांमध्ये जवळीकता वाढू लागली आणि त्यानंतर अजय आणि करिश्मा एकमेकांना डेट करू लागले. पण याच दरम्यान अजय देवगणचे नाव रवीना टंडनसोबतही जोडले जाऊ लागले. यानंतरच अजय देवगण आणि करिश्माचे नाते संपुष्टात आले.
अभिषेक बच्चनसोबत होणार होतं लग्न
एक काळ असा होता की फिल्मी दुनियेत करिश्मा कपूर आणि अभिषेक बच्चन यांची नावे एकत्र घेतली जात होती. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पूर्णपणे वेडे झाले होते आणि त्यांना लग्न करायचे होते. दोघेही पहिल्यांदा 1997 मध्ये अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन आणि राज कपूर यांचा नातू निखिल नंदा यांच्या लग्नात भेटले होते आणि दोघांनीही पहिल्या भेटीतच एकमेकांच्या प्रेमात पडले होते.
त्या काळात करिश्मा बॉलिवूडची सुपरहिट अभिनेत्री होती आणि अभिषेकने फिल्मी दुनियेत पाऊलही ठेवले नव्हते. मात्र, जेव्हा अभिषेकने फिल्मी दुनियेत पाऊल ठेवले होते, तेव्हा अचानक 2002 साली करिश्मा आणि अभिषेकच्या लग्नाची चर्चा सुरु झाली. या बातमीने चाहत्यांना तसेच अनेक सेलिब्रिटींना आश्चर्याचा धक्का बसला.
अमिताभ बच्चन यांच्या 60व्या वाढदिवसानिमित्त करिश्मा कपूर आणि अभिषेक बच्चन यांची एंगेजमेंट झाली. मात्र, त्यांचे नाते फार काळ टिकले नाही. लग्नानंतर पाच महिन्यांनी त्यांचे नाते तुटले. या एका बातमीने चित्रपट विश्वात पुन्हा खळबळ उडाली. अभिनेत्रीची आई बबिता यांच्यामुळे अभिषेक आणि करिश्माचे नाते तुटल्याचे अनेक रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. असा दावा केला जातो की त्या काळात अभिषेकचे कोणतेही करिअर नव्हते आणि बच्चन कुटुंबाची आर्थिक स्थितीही चांगली नव्हती.
अशा परिस्थितीत आपल्या मुलीचे लग्न अभिषेकसोबत व्हावे असे बबिता यांना वाटत नव्हते. काही रिपोर्ट्समध्ये असेही म्हटले आहे की, करिश्माने लग्नानंतर फिल्मी दुनियेत काम करावे असे जया बच्चन यांना वाटत नव्हते. असा दावा केला जात आहे.
करिश्मा कपूरच्या आयुष्यात बिझनेसमन संजय कपूरची एन्ट्री झाली आणि दोघांनी 29 सप्टेंबर 2003 रोजी लग्न केले. संजय कपूर शीख धर्माचा असल्याने दोघांनीही पारंपारिक शीख रितीरिवाजांनुसार लग्न केले होते. करिश्मा कपूर आणि संजय कपूर त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंदी होते. लग्नानंतर दोघेही अदारा आणि कियान या दोन मुलांचे पालक झाले. मात्र, करिश्माचे लग्न फार काळ टिकले नाही.
लग्नाच्या 13 वर्षानंतर दोघांनी घटस्फोट घेतला. करिश्मा कपूरने पती संजय कपूरवर अनेक गंभीर आरोप करत घटस्फोट घेतला होता आणि आज अभिनेत्री आपल्या दोन्ही मुलांसोबत आयुष्य जगत आहे.