अक्षय कुमार आणि जॉन अब्राहमसोबत दिसलेल्या 'या' अभिनेत्रीला डेट करतोय आर्यन खान!

Aryan Khan Dating this Actress : अक्षय कुमार आणि जॉन अब्राहमसोबत स्क्रिन शेअर करणाऱ्या या अभिनेत्रीला डेट करतोय आर्यन खान...

दिक्षा पाटील | Updated: Apr 2, 2024, 03:02 PM IST
अक्षय कुमार आणि जॉन अब्राहमसोबत दिसलेल्या 'या' अभिनेत्रीला डेट करतोय आर्यन खान! title=
(Photo Credit : Social Media)

Aryan Khan Dating this Actress : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. सध्या त्याचं चर्चेत असण्याचं कारण त्याचं रिलेशनशिप आहे. अशी चर्चा आहे की आर्यन खान हा ब्राझीलची अभिनेत्री लारिसा बोन्सीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. एका नेटकऱ्यानं आर्यन खान आणि लारिसा बोन्सीमध्ये जवळीक होत असल्याचे म्हटले आहे. 

खरंतर रेडिटवर एका नेटकऱ्यानं आर्यन खानच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला पाहिल्यानंतर त्याला एक गोष्ट कळली की आर्यन खान हा लारिसाच्या संपूर्ण कुटुंबाला फॉलो करतो. आर्यननं कथितपणे लारिसाच्या आईला तिच्या वाढदिवसाच्या दिवशी गिफ्टही पाठवलं होतं. तिसं तिच्या स्टोरीवर पाहायला मिळालं, असं त्या नेटकऱ्यानं सांगितलं. त्याशिवाय आर्यन आणि लारिसाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

Aryan Khan with Larrisa Bonesi.
byu/South-Catch6393 inBollyBlindsNGossip

लारिसाच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती एक अभिनेत्री आहे. ती गुरु रंधावाच्या 'सूरमा सूरमा' म्युजिक व्हिडीओ, स्टेबिन बेनच्या म्यूजिक व्हिडीओ आणि इतकंच नाही तर विशाल मिश्रासोबत दिसली होती. त्याशिवाय लारिसानं अक्षय कुमार आणि जॉन अब्राहमच्या 'देसी बॉइज'मध्ये काम केलं आहे. त्याशिवाय ती टायगर श्रॉफ, सूरज पंचोलीसोबतही म्यूजिक व्हिडीओमध्ये दिसली होती. लारिसा बोन्सीनं टॉलीवूडमध्ये देखील काम केलं आहे. त्यात 'नेक्स्ट एनी' आणि 'थिक्का' सारखे चित्रपट आहेत. तर बॉलिवूडमध्ये तिच्या करिअरची सुरुवात तिनं सैफ अली खानच्या 'गो गोवा गॉन' या चित्रपटातून केली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : प्रथमेश व्यवसायात मुग्धा देणार साथ; गुढीपाडव्याच्या मुर्हूतावर करणार नवी सुरुवात!

आर्यन खानच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तो 'स्टारडम' या त्याच्या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. या वेब सीरिजमधून आर्यन खान हा दिग्दर्शनात पदार्पण करणार आहे. त्याच्या या वेब सीरिजला पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. शाहरुख खानच्या या प्रोजेक्टला घेऊन प्रेक्षक आतुर आहेत. दरम्यान, असं देखील म्हटलं जातं की त्याच्या वेब स्टोरीचे राइट्स घेण्यासाठी काहीही ओटीटी प्लॅटफॉर्म त्याच्याकडे आधीच पोहोचले. तर आर्यन खान त्याच्या या प्रोजेक्टमध्ये शाहरुख खानसोबत काम करत नाही आहे. मात्र, आर्यन हा त्याच्या लाइफस्टाइल ब्रॅंडसाठी शाहरुखसोबत काम करतोय. यासाठी आर्यननं ना फक्त शाहरुखला डायरेक्ट केलं. त्याशिवाय त्याच्या लूकसोबत एक्सपेरिमेंट देखील केले.