Aryan Khan New Year Celebration: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान नेहमी सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी तो त्याच्या पहिल्या प्रोजेक्ट 'स्टार्डम'मुळे चर्चेत आहे. अशातच तो त्याच्या पर्सनल लाईफमुळेही चर्चेत आला आहे. त्याचे नाव लारिसा बोन्सी हिच्यासोबत जोडले गेले आहे. मात्र, दोघांनीही याला दुजोरा दिलेला नाहीये.
आर्यन खान आणि लारिसा बोन्सी अनेकदा एकत्र पार्टीत दिसले आहेत. अशातच नुकतेच दोघांनीही एकत्र नवीन वर्ष साजरे केले. आर्यन खानच्या ब्रँडने ही पार्टी आयोजित केली होती. ज्यामध्ये दोघेही पार्टीनंतर एकत्र निघताना दिसले होते. पार्टीदरम्यान आर्यन खान सर्वात आधी बाहेर आला आणि त्याच्या गाडीत बसला. काही वेळाने लारिसा बोन्सी ही बाहेर आली आणि तिच्या कारकडे गेली. यावेळी नेहमी प्रमाणे आर्यन खान गंभीर असल्याचा दिसला.
कोण आहे लारिसा बोन्सी?
लारिसा बोन्सी ही एक मॉडेल, अभिनेत्री आणि डान्सर आहे. तिने बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि जॉन अब्राहम यांच्यासोबत काम केलं आहे. लारिसा बोन्सीने देसी बॉयजमधील 'सुबह होने न दे' या गाण्यामध्ये डान्स केला आहे. यामधूनच तिने बॉलिवूड करिअरला सुरुवात केली. लारिसा बोन्सीने अनेक म्यूझिक व्हिडीओमध्ये काम केलं आहे. ती गुरु रंधावासोबत 'सूरमा-सूरमा' म्यूझिक व्हिडीओमध्ये दिसली होती.
त्यासोबत अभिनेत्री लारिसा बोन्सीने स्टेबिन बेन आणि विशाल मिश्रा यांच्यासोबत देखील काम केलं आहे. तिने साउथ इंडस्ट्रीमध्ये देखील काम केलं आहे. तिने 'नेक्स्ट एनी' आणि 'थिक्का' या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. बॉलिवूडमध्ये तिने सैफ अली खानसोबत 'गो गोवा गॉन' या चित्रपटात काम केलं आहे.
सोशल मीडियावर आर्यन खान आणि लारिसा बोन्सी यांच्या डेटिंगच्या बातम्या देखील आल्या होत्या. तर आर्यन खान हा लारिसा बोन्सीसोबत तिच्या कुटुंबाला इन्स्टाग्रामवर फॉलो करतो. सोशल मीडियावर दोघांच्या अनेक बातम्या देखील व्हायरल झाल्या होत्या. सध्या आर्यन खान 2025 मध्ये प्रदर्शित होणाऱ्या एका सीरिजचे दिग्दर्शन करण्याच्या तयारीत आहे.