पती-पत्नीमधील नाते हे एकमेकांवरील विश्वास, प्रेमावरर आधारित असते. जर नात्यात यापैकी कोणतीही गोष्ट कमी असेल तर ते नाते तुटते. त्याच वेळी, असे देखील अनेक वेळा घडते की, सुरळीत चालणाऱ्या वैवाहिक जीवनात तिसरी व्यक्ती प्रवेश करते आणि पती-पत्नीमधील नाते बिघडवते. असा समज आहे की, पुरुष सर्वात जास्त फसवणूक करतात, परंतु महिला देखील फसवणूक करतात. लग्नानंतरही दुसऱ्याकडे आकर्षित होणे आणि इतरांशी संबंध ठेवणे ही समाजात एक सामान्य गोष्ट झाली आहे. पण हे का घडत आहे हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. यामागे कोणतेही ठोस कारण नाही, परंतु काही गोष्टी जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
अभ्यासानुसार, कोणत्याही नात्यात जोडीदारांना एकमेकांशी भावनिकरित्या जोडले जाणे महत्वाचे आहे. जर जोडीदार एकमेकांच्या भावना समजून घेत नसतील, जर त्यांचे एकमेकांशी भावनिक संबंध नसेल तर कोणतेही नाते जास्त काळ टिकू शकत नाही. पुरुष बाहेरून कठोर दिसू शकतात पण ते स्वभावाने खूप भावनिक असतात, बऱ्याच वेळा ते त्यांच्या जोडीदारासमोर उघडपणे त्यांच्या भावना व्यक्त करू शकत नाहीत. जेव्हा त्यांना त्यांच्या जोडीदाराकडून आवश्यक भावनिक आधार मिळत नाही, तेव्हा ते अनेकदा भावनिक आधारासाठी दुसऱ्या कोणाचा तरी शोध घेतात.
काही पुरुषांचे विवाहबाह्य संबंध असण्याचे कारण म्हणजे त्यांना त्यांच्या नेहमीच्या दिनचर्येचा कंटाळा येतो. त्यांच्या दैनंदिन कंटाळवाण्या दिनचर्येत थोडेसी रंगत भरण्यासाठी विवाहबाह्य संबंध बनवतात. आयुष्यभर एकाच जोडीदारासोबत राहणे त्यांच्यासाठी एक ओझे बनू शकते. इतर महिलांसोबतच्या नातेसंबंधात असल्याने तिला एक नवीन अनुभूती मिळते. असे विचार करणारे लोक परिणामांचा विचार न करता त्यांचे वैवाहिक जीवन उद्ध्वस्त करतात.
अनेक पती-पत्नींमध्ये समन्वयाचा अभाव असतो, ज्यामुळे त्यांचे नाते चांगले राहत नाही. ते छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद घालत राहतात आणि भांडत राहतात. अशा कठीण वातावरणातून बाहेर पडल्यानंतर, ते शांती आणि आरामाच्या शोधात दुसऱ्या स्त्री किंवा पुरुषाकडे आकर्षित होतात. बहुतेक प्रकरणांमध्ये ही समस्या लग्नाच्या अनेक वर्षांनंतर उद्भवते.
पुरूषत्वाची व्याख्या अनेक पुरुषांच्या मनात गोंधळात टाकणारी आहे. काही लोकांचा असा विश्वास आहे की, खरं पुरुषत्व तेच असते जो, कोणाच्याही भीतीशिवाय सार्वजनिक ठिकाणी जे हवं ते करु शकतो. अशा परिस्थितीत, ते संधीचा फायदा घेतात आणि विवाहबाह्य संबंधांमध्ये अडकतात. ही विकृत विचारसरणी त्यांना असे वाटू देत नाही की, त्यांचे वैवाहिक जीवन उद्ध्वस्त होत आहे.
शारीरिक संबंध हा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील एक अतिशय महत्त्वाचा भाग असतो. याचा वैवाहिक जीवनावर गंभीर परिणाम होतो. जेव्हा सेक्सचा विचार केला जातो तेव्हा काही पुरुष आयुष्यभर त्यांच्या पत्नींशी विश्वासू राहतात. त्याच वेळी, काही पुरुषांसाठी, सेक्स हा मनोरंजनाचा एक प्रकार आहे. आयुष्यभर एकाच जोडीदारासोबत सेक्स करणे त्यांच्यासाठी खूप कंटाळवाणे बनते. म्हणून विवाहबाह्य संबंधांमध्ये अडकतात.