Anushka Sharma will come to Mumbai : भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीचा काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ व्हायरल झाला. विराटनं हा व्हिडीओ आरसीबी (रॉयल चैलेंजर्स बंगळुरु) नं सामना जिंकल्या नंतर पत्नी अनुष्काला व्हिडीओ कॉल केला होता. या व्हिडीओ कॉलमध्ये विराट अनुष्काशी बोलल्यानंतर वामिका आणि मुलगा अकाय कोहलीसोबत मस्ती करताना दिसला. नेटकऱ्यांना विराटचा हा व्हिडीओ प्रचंड आवडला. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांना अनुष्काची आठवण आली ते सगळे अनुष्का भारतात येण्याची प्रतिक्षा करत आहेत. चला तर जाणून घेऊया अनुष्का मुलगी वामिका आणि अकायसोबत लंडनहून कधी परतणार हे जाणून घेऊया.
खरंतर, अकायच्या जन्म झाल्यापासून अनुष्का ही लंडनमध्येच आहे. विराटही तिच्यासोबत लंडनमध्येच होता. मात्र, आयपीएलपाहता तो भारतात परतला. तर, अनुष्का ही त्यांच्या मुलांसोबत अजूनही लंडनमध्ये आहे. जेव्हा पासून ते लंडनला गेले होते तेव्हापासून ते दोघे कुठे स्पॉट झाले नव्हते आणि नाही त्यांचा कोणता फोटो समोर आला होता. अशात त्या दोघांचे चाहते त्यांना संपूर्ण कुटुंबासोबत एकत्र पाहण्यासाठी आतुर आहेत. मात्र, आता ही प्रतिक्षा लवकरच संपणार आहे. बॉलिवूड लाइफच्या एका रिपोर्टनुसार, अनुष्का ही जून महिन्यात भारतात येणार आहे.
दरम्यान, वामिका जानेवारी महिन्यात 3 वर्षांची झाली आहे आणि आता तिचं शाळेत अॅडमिशन घेण्याची वेळ आली आहे. आता तर शाळा बंद आहे, मात्र उन्हाळ्याच्या सुट्ट्यांनंतर जूनमध्ये सगळ्या शाळा या सुरु होतील. अशात असा अंदाज लावण्यात येत आहे की अनुष्का ही मे किंवा जून महिन्यात वामिकाचं अॅडमिशन घेण्यासाठी ती भारतात येऊ शकते. त्यातही इतरही सेलिब्रिटींप्रमाणे वामिका ही धिरूभाऊ अंबानी शाळेत जाऊ शकते असं म्हटलं जातं आहे. खरंतर, त्या गोष्टीची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
त्याशिवाय रॉबिन उथप्पा दिलेल्या एका मुलाखतीत विराटनं सांगितलं की 'जगात तो कोणा समोरही स्ट्रीक्ट राहू शकतो. पण जेव्हा मुलांची गोष्ट येते तेव्हा मी एकदम शांत होतो.' त्यावर उत्तर देत रॉबिन बोलतो की "याचा अर्थ वामिकाला पाहिजे तसं विराट करतो." त्यावर उत्तर देत विराट हसून बोलतो की "हो".
हेही वाचा : VIRAL झालेल्या 'गुलाबी साडी' गाण्यावर थिरकली धनश्री वर्मा! चाहत्यांना आठवला चहल; पाहा Video
विराटनं पुढे सांगितलं की "दोन्ही मुलांना एकत्र सांभाळणं कठीण आहे. त्यामुळे अनुष्का अकायची काळजी घेते तर तो वामिकाची काळजी घेतो."