Raj Kundra Case : शिल्पा शेट्टीचा कोस्टार आजही पाहतोय तिची वाट

राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टी कॅमेऱ्यापासून लांब 

Updated: Aug 17, 2021, 11:33 AM IST
Raj Kundra Case : शिल्पा शेट्टीचा कोस्टार आजही पाहतोय तिची वाट title=

मुंबई : Raj Kundra Case : राज कुंद्रा प्रकरणानंतर अभिनेत्री शिल्पा शेट्टीवर आभाळ कोसळलं आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राला अटक करण्यात आलं आहे. यानंतर शिल्पा शेट्टीवर देखील टीका करण्यात आली. याप्रकरणानंतर शिल्पा शेट्टीने कार्यक्रमांना जाणं बंद केलं. शिल्पा शेट्टी या प्रकरणा दरम्यान डान्स रिऍलिटी शो 'सुपर डान्सर'च्या चौथ्या सिझनमध्ये परिक्षकाची जबाबदारी सांभाळत होती. मात्र या प्रकरणानंतर शिल्पा शेट्टीने शोच्या शुटिंगला जाणं बंद केलं आहे. यावर फिल्ममेकर अनुराग बसूने आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shilpa Shetty Kundra (@theshilpashetty)

फिल्ममेकर अनुराग बसुचं म्हणणं आहे की,'आम्ही शिल्पा शेट्टीला सेटवर खूप मिस करत आहोत.' पुढे अनुराग म्हणाले की, माहित नाही शिल्पा शेट्टी सेटवर कधी येणार आहे. शिल्पा शेट्टी आणि अनुराग बसू डान्स रिऍलिटी शोमध्ये परिक्षक म्हणून एकत्र काम करतात. 

शिल्पाचे पती आणि व्यावसायिक राज कुंद्राला पोर्नोग्राफी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. तेव्हापासून शिल्पा देखील कॅमेरापासून लांब आहे. शिल्पा आणि अनुराग यांच्यात खूप चांगल नातं आहे. ते एक कुटूंब म्हणून राहतात. त्यामुळे आपल्या जवळची व्यक्ती नसली की त्याची उणीव जाणवते.