'आम्ही पब्लिक फिगर असतो म्हणून...', कोणत्याही गोष्टीवर मत न मांडण्यावर Anuja Sathe चं वक्तव्य

Anuja Sathe on not Expressing Her Thoughts : मराठमोळी अभिनेत्री अनुजा साठेनंं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. दरम्यान, अनुजा ही सोशल मीडियावर सक्रिय असून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. तिच्या पोस्ट नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. 

दिक्षा पाटील | Updated: May 20, 2023, 01:23 PM IST
'आम्ही पब्लिक फिगर असतो म्हणून...', कोणत्याही गोष्टीवर मत न मांडण्यावर Anuja Sathe चं वक्तव्य title=
(Photo Credit : Anuja Sathe Instagram)

Anuja Sathe on not Expressing Her Thoughts : लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री अनुजा साठी ही तिच्या अभिनयासोबतच स्टाईलसाठीही ओळखली जाते. अनुजा फक्त मालिकांमध्येच नाही तर चित्रपट ते नाटकांमध्येही काम केलं आहे. याशिवाय अनुजानं हिंदी चित्रपटसृष्टीतही काम करत तिची छाप सोडली आहे. अनुजा ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत अनुजा चाहत्यांच्या संपर्कात राहते. पण तुमच्या कधी हे लक्षात आलं का की इतर काही कलाकारांप्रमाणे अनुजा कधीच कोणत्या धर्मावर, राजकीय किंवा मग सामाजिक गोष्टींवर भाष्य करत नाही. मग या मागचं नेमक कारण काय हे नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अनुजानं सांगितलं आहे. हे वक्तव्य तिनं फक्त तिच्या वतीनं नाही तर सगळ्या कलाकारांच्या वतीनं केलं आहे. 

अनुजानं नुकतीच 'महाराष्ट्र टाइम्स'ला मुलाखत दिली होती. यावेळी राजकीय आणि सामाजिक गोष्टींवर बोलत का नाही यावर सांगत म्हणाली, 'जे घडतं त्यावर एक नागरिक म्हणून आपण दखल घेतलीच पाहिजे आणि कलाकार म्हणून व्यक्त होण्याची जबाबदारीही समजून घेतली पाहिजे. पण बऱ्याचवेळा त्यावरून कलाकारांविषयी अनेक गोष्टी बोलल्या जातात आणि त्यांना पातळी सोडून ट्रोल केलं जातं. आम्ही पब्लिक फिगर असतो म्हणून लोक त्यांना वाट्टेल ते बोलतात. यामुळेच आपली मतं आपल्याकडे ठेवून गप्प बसावं ही भूमिका कलाकार घेत असल्याचं दिसतं आणि तेच मलाही योग्य वाटतं. त्यामुळे राजकारण, जात, धर्म यांबद्दल बोलण्या ऐवजी समाजातील इतर समस्या, पाळीव प्राणी, वन्यजीवन याबद्दल व्यक्त व्हायला मला आवडेल.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आजवर अनेक चाहत्यांना प्रश्न होता की आपले आवडते कलाकार कधीच कोणत्या गोष्टीवर बोलत का नाहीत. तर त्याचे कारण आता अनुजानं सांगितलं आहे. पण असं असलं तरी जेव्हा कलाकार काही बोलत नाही तेव्हा देखील त्यांना ट्रोल करण्यात येते आणि तुम्ही बोलत का नाही. तुम्हाला बोलायला हवं असं अनेक नेटकरी बोलताना दिसतात. 

हेही वाचा : Devoleena Bhattacharjee पती शाहनवाजला म्हणाली खरा भारतीय मुस्लीम, लव्ह जिहादवर सडेतोड उत्तर

दरम्यान, अनुजाच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती लवकरच फकाट या चित्रपटातून तिच्या चाहत्यांना भेटायला येणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत हेमंत ढोमे दिसणार आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन श्रेयस जाधवनं केलं आहे. तर चित्रपटाची निर्मिती ही निता जाधव यांनी केली आहे. हा चित्रपट 2 जून रोजी प्रदर्शित होणार आहे