18 वर्षांनी पुन्हा 'या' चित्रपटाचा धमाका: तिसऱ्या भागाची प्रतिक्षा आणि क्लायमॅक्सचा सस्पेन्स

बॉलिवूडचा एक अविस्मरणीय हिट चित्रपट 18 वर्षांनी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तब्बल 18 वर्षे प्रेक्षक या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यातला सस्पेन्स, क्लायमॅक्स आणि रोमांचक दृश्यांची त्यांना खूपच उत्सुकता आहे.

Intern | Updated: Dec 21, 2024, 04:46 PM IST
18 वर्षांनी पुन्हा 'या' चित्रपटाचा धमाका: तिसऱ्या भागाची प्रतिक्षा आणि क्लायमॅक्सचा सस्पेन्स title=

ज्या चित्रपटाबद्दल आपण बोलत आहोत, हा एक विनोदी चित्रपट आहे आणि याच्या तिसऱ्या भागाच्या रिलीजची लोक इतकी वर्षे वाट पाहत आहेत. या चित्रपटाचा क्लायमॅक्स प्रेक्षकांच्या मनात कायमचा राहिला आहे. चित्रपटाचा शेवट इतक्या उत्सुकतेने भरलेला होता की प्रेक्षक ते दृश्य कधीच विसरू शकत नाहीत. त्या शेवटच्या सीनमुळे लोक अजूनही 'आता पुढे काय होईल?' याचा विचार करत आहेत आणि इतक्या वर्षांनी या चित्रपटाचा पुढचा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हा चित्रपट म्हणजे 'फिर हेरा फेरी', जो 'हेरा फेरी' या लेकप्रिय चित्रपटाचा सिक्वेल आहे. 'हेरा फेरी' चे चाहते नक्कीच आठवतील की या चित्रपटाच्या शेवटी राजू (अक्षय कुमार) एका पुलाच्या कडेला लटकलेला दिसतो आणि त्याचं सीनमध्ये दुसरीकडे बाबुराव आणि श्याम (परेश रावल आणि सुनिल शेट्टी) तेथे उभे असतात. राजू त्याची फेकलेली वस्तू पुलाला अडकल्याने तो पुन्हा फेकायचा प्रयत्न करत असतो. त्याचवेळी बाबुराव आणि श्यामचा राजूला फोन येतो आणि आता हा प्रश्न उभा राहतो की, राजू त्या फोनला उत्तर देईल का? आणि पुलाला अडकलेली वस्तू तो पुन्हा आपल्याकडे आणू शकेल का?

हे दृश्य इतके ताणलेले आणि सस्पेन्सने भरलेले होते की प्रेक्षक त्याला कधीच विसरू शकत नाहीत. आता हा सस्पेन्स आणि रहस्य तिसऱ्या भागात उलगडणार आहे आणि लोक उत्सुकतेने वाट पाहत आहेत की अक्षय कुमारच्या पात्राचे पुढे काय होईल.

तिसऱ्या भागाची तयारी जोरात सुरू आहे. 'फिर हेरा फेरी'चा तिसरा भाग 2025 मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. 'हेरा फेरी'चा पहिला भाग 2000 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अक्षय कुमार, परेश रावल, सुनिल शेट्टी आणि तब्बू यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती. त्याचबरोबर ओम पुरी, कुलभूषण खरबंदा, असरानी, गुलशन ग्रोवर यांसारखे दिग्गज कलाकारही होते. 'फिर हेरा फेरी' मध्ये अक्षय कुमार, परेश रावल, सुनिल शेट्टी यांसोबत जॉनी लीव्हर, बिपाशा बासू आणि रिमी सेन यांचाही समावेश होता आणि तो 2006 मध्ये प्रदर्शित झाला. त्यावेळी चित्रपटाने प्रचंड यश मिळवले होते. 

दुसऱ्या भागाचा सस्पेन्स, त्याचे कॅरेक्टर्सचे आणि क्लायमॅक्स या सर्व गोष्टी लोकांच्या मनात अजून ही घर करून आहे. आता 'फिर हेरा फेरी 3' ने तो सस्पेन्स कसा उलगडला जातो आणि या चित्रपटाचा आणखी कोणत्या कॅरेक्टर्सचा समावेश होतो याची आतुरतेने लोक वाट पाहात आहेत.