'पुष्पा 2' वादाच्या भोवऱ्यात, 22 दिवसांनंतर डिलीट करावं लागलं 'हे' गाणं, काय आहे प्रकरण?

अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' चित्रपट रिलीज होताच वादांमध्ये सापडला आहे. चित्रपटाच्या प्रीमियरमध्ये चेंगराचेंगरी झाल्यानंतर आता चित्रपटातील गाण्यामुळे चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.   

सोनेश्वर पाटील | Updated: Dec 27, 2024, 01:59 PM IST
'पुष्पा 2' वादाच्या भोवऱ्यात, 22 दिवसांनंतर डिलीट करावं लागलं 'हे' गाणं, काय आहे प्रकरण?  title=

Pushpa 2 New Song Deleted After Controversy: अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांचा 'पुष्पा 2' चित्रपट 5 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. चित्रपट रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच वादात सापडला आहे. जरी चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई करत असला तरी चित्रपटाबाबतचे वाद देखील वाढताना दिसत आहेत. 

दरम्यान, 4 डिसेंबर रोजी अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' चित्रपटाचा प्रीमियर शो पार पडला. यावेळी अभिनेत्याच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात थिएटरमध्ये गर्दी केली होती. यावेळी चेंगराचेंगरी झाली. ज्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला. त्यासोबतच महिलाचा लहान मुलगा देखील जखमी झाला. हे प्रकरण संपत नाही तोपर्यंत या चित्रपटातील गाणं 'दमुन्ते पट्टुकोरा' वादात सापडले आहे. ज्यामध्ये 'पुष्पराज' शेखावतला आव्हान देताना दिसत आहे. 

नेमकं प्रकरण काय? 

'पुष्पा 2' चित्रपटातील 'दमुन्ते पट्टुकोरा' हे गाणं वादात सापडले आहे. ज्यामध्ये 'पुष्पराज' शेखावतला आव्हान देताना दिसत आहे. तो म्हणतो की, 'हिंमत असेल तर मला पकड'. हे गाणे चित्रपटातील एसपी भंवर सिंह शेखावत या फहद फासिलच्या पात्रासाठी बनवले गेले असले तरी सोशल मीडियावर यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर निर्मात्यांना हे गाणे यूट्यूबवरून हटवावे लागले. नेटकरी देखील या गाण्यावर प्रश्न उपस्थित करत आहेत. त्यासोबतच संध्या थिएटर चेंगराचेंगरीप्रकरणी निर्माते पोलीस अधिकाऱ्यांना टार्गेट करत आहेत का? असा देखील प्रश्न उपस्थित करत आहेत. या वादामुळे हे गाणं यूट्यूबवरून हटवण्यात आले आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

चेंगराचेंगरी प्रकरणी अल्लू अर्जुनला झाली होती अटक 

हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये 'पुष्पा 2' चित्रपटाच्या प्रीमियरच्या वेळी चेंगराचेंगरीमध्ये एका 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. त्यासोबतच तिचा 8 वर्षांचा मुलगा देखील यामध्ये जखमी झाला होता. सध्या या मुलाची तब्येत ठीक असल्याचं देखील म्हटलं जात आहे. मात्र, या प्रकरणी अल्लू अर्जुनला 13 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर अभिनेत्याला जामीन मिळाला. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.