'मी तुझी...', रणबीर कपूरशी लग्न करण्याआधी नीतू सिंग आलियाच्या कानात काय पुटपुटल्या?

Alia Bhatt : आलिया भट्टनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा तिच्या लग्नाच्या आधी तिला नीतू कपूर यांनी काय सांगितलं याचा खुलासा केला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Oct 15, 2024, 11:56 AM IST
'मी तुझी...',  रणबीर कपूरशी लग्न करण्याआधी नीतू सिंग आलियाच्या कानात काय पुटपुटल्या? title=
(Photo Credit : Social Media)

Alia Bhatt : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांची जोडी लोकप्रिय सेलिब्रिटी कपल्सपैकी एक आहे. 2022 मध्ये आलिया आणि रणबीर हे लग्न बंधनात अडकले. दोघांनी मुंबईतील घरातच लग्न केलं. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत करीना कपूरशी बोलताना आलियानं तिच्या आणि तिची सासू नीतू कपूरच्या नात्यावर मोकळेपणानं सांगितलं आहे आणि सांगितलं की लग्नाच्या वेळी त्यांनी तिला काय सल्ला दिला होता. 

मिर्ची प्लससाठी करीना कपूरला दिलेल्या मुलाखतीत आलिया भट्टनं या सगळ्या गोष्टींविषयी सांगितलं. चॅट दरम्यान, करीनानं आलियाला विचारलं की कपूर कुटुंबातील कोणती व्यक्ती तिला सगळ्यात जास्त आवडते. तर आलियानं सासू नीतू कपूर यांचं नावं घेतलं. तिनं पुढे सांगितलं की गेल्या काही वर्षांमध्ये माझी मैत्री खूप चांगली झाली आहे. गेल्या सहा महिन्यात ही मैत्री खूप घट्ट झाली आहे आणि जेव्हा लोरियलसाठई वॉक करत होती तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की त्यांना शोसाठी यायचंय. जेव्हा मी वॉक करत होते तेव्हा त्या सगळ्यात जास्त चियर करत होत्या. असं वाटतं होतं की मी शाळेत पुन्हा आले आहे आणि मी माझ्या आईला तिथे पाहत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

पुढे आलिया म्हणाली 'मला अजूनही आठवण आहे की आम्ही लग्न करत होतो, तेव्हा त्या आल्या आणि मला म्हणाल्या, तू माझी सून आहे आणि मी तुझी सासू पण माझ्या सासूसोबत माझी खूप चांगली मैत्री होती. त्या कृष्णा आंटी आणि त्यांच्यासोबत घालवलेल्या आठवणींनविषयी खूप प्रेमानं सांगत होत्या. पुढे त्यांनी सांगितलं की मी माझ्या सुनेसोबत माझंही असंच नातं असावं. त्या खरंच खूप चांगली आणि सकारात्मक आणि आशावादी विचार करणारी आहे.'

हेही वाचा : आलिया भट्ट ADHD या गंभीर आजारानं त्रस्त; स्वत: केला खुलासा; काय आहेत याची लक्षणं?

रणबीर आणि आलियानं अयान मुखर्जीच्या 2022 च्या ब्लॉकबस्टर ठरलेल्या 'ब्रह्मास्त्र: पार्ट वन - शिवा' या चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी डेटिंगला सुरुवात केली. त्यांनी 2022 मध्ये मुंबईच्या घरात एक इंटिमेट वेडिंग सेरेमनी ठेवण्यात आली. तिथेच त्यांनी सप्तपदी घेतल्या. कामाविषयी बोलायचं झालं तर पुढच्या वर्षी आलिया-रणबीर हे दोघेही संजय लीला भन्साळी यांच्या 'लव्ह अॅन्ड वॉर' या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.