लग्नाआधी रणबीरच्या मिठीत दिसली आलिया, दोघांचा खास फोटो समोर...

14 एप्रिल रोजी आलिया आणि रणबीर लग्न करणार असल्याचं कळत आहे. सध्या सर्वत्र त्यांच्या लग्नाबद्दल चर्चा सुरू आहे..   

Updated: Apr 10, 2022, 03:41 PM IST
लग्नाआधी रणबीरच्या मिठीत दिसली आलिया, दोघांचा खास फोटो समोर...

मुंबई : अखेर तो क्षण नजीक आलाच. अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट ही जोडी त्यांच्या प्रेमाच्या नात्याला आता नवी ओळख देण्यास सज्ज झाली आहे.  14 एप्रिल रोजी आलिया आणि रणबीर लग्न करणार असल्याचं कळत आहे. सध्या सर्वत्र त्यांच्या लग्नाबद्दल चर्चा सुरू असताना, रणबीर आणि आलियाचा एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये एकमेकांच्या प्रेमात फार मग्न झाल्याचं कळत आहे. 

आलिया आणि रणबीरचा व्हायरल होत असलेला फोटो त्यांच्या आगामी सिनेमातील आहे. रणबीर आणि आलिया 'ब्रह्मास्त्र' (Brahmastra) सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

खुद्द आलियाने सिनेमाचा पोस्टर शेअर केला आहे. फोटो पोस्ट तकरत तिने कॅप्शनमध्ये, 'Love & light ' असं लिहिलं आहे. सध्या सर्वत्र आलिया आणि रणबीरच्या आगामी सिनेमाची चर्चा आहे. 

दरम्यान, आलिया आणि रणबीरच्या लग्नाबद्दल सांगायचं झालं तर, रोज त्यांच्या लग्नाबद्दल नवे अपडेट्स समोर येत असतात. काही दिवसांपूर्वी  या जोडप्याच्या लग्नाच्या तारखेपासून ते लग्नाच्या ठिकाणापर्यंतची माहिती समोर आली आहे. 

बॉम्बे टाइम्सच्या रिपोर्टनुसार, रणबीर कपूरने त्याच्या वास्तू बिल्डिंगमध्ये 8 दिवसांसाठी बँक्वेट हॉल बुक केला आहे.आलिया आणि रणबीरने लग्नाची तयारी सुरू केली आहे, असं म्हणायला हरकत नाही.