मुलीपासून काजोल दूर असण्याला 'ते' विचित्र प्रसंग कारणीभूत

...म्हणून असते कॅमेरा, प्रसिद्धीपासून दूर 

Updated: Aug 25, 2021, 06:39 PM IST
मुलीपासून काजोल दूर असण्याला 'ते' विचित्र प्रसंग कारणीभूत  title=
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

मुंबई : सेलिब्रिटींच्या मुलांचं जीवन, त्यांना मिळणाऱ्या सुखसोई आणि अनेक इतरही गोष्टी पाहता या मुलांचा अनेकांनाच हेवा वाटतो. सेलिब्रिटींच्या मुलांचं आयुष्यही एका वळणावर चाहत्यांच्या वर्तुळात चर्चेचा विषय ठरतं. पण, त्यांनाही अडचणींचा सामना करावा लागतोच. कमी- जास्त प्रमाणात त्यांच्यासमोरही काही आव्हानं उभी ठाकतात, जेव्हा त्यांच्या कुटुंबाला काही महत्त्वाचे आणि मोठे निर्णय घ्यावे लागतात. 

आव्हानांचा सामना करण्याचा मुद्दा आला की ओघाओघाने आत्मविश्वासाचा पायाही आणखी भक्कम होऊ लागतो. अभिनेता अजय देनगन आणि अभिनेत्री काजोल यांची मुलगी न्यासा हिच्यापुढं फार कमी वयातच आव्हानाची परिस्थिती ओढावली. ज्यामुळं काजोलच्या कुटुंबाला काही मोठे निर्णय घ्यावे लागले. 

अजय (Ajay dengn) आणि काजोल (Kajol) कायमच त्यांच्या मुलांच्या बाबतीत अतिशय सावध आणि सतर्क असल्याचं पाहायला मिळतं. सोशल मीडिया ट्रोलिंग झाल्यावरही ते दोघं आपल्या मुलांबाबत खिल्ली उडवणाऱ्यांवर नाराजी व्यक्त करतात. काजोलनं तिच्या मुलीसंदर्भातील अशाच एका निर्णयाची वाच्यता केली होती, जिथं तिला न्यासाला आपल्यापासून दूर करावं लागलं होतं. 

अजय दोन्ही मुलांची काळजी कशी घेतो, असा प्रश्न तिला जेव्हा विचारण्यात आला होता तेव्हा याचं उत्तर देत काजोल म्हणालेली, 'न्यासाला घरी येण्यास उशीर झाला की, अजय फार विचलित होतो. तो एका जागी शांतच बसत नाही. वारंवार ती कधी परत येणार असं विचारत असतो. न्यासा फारच समजुतदार आहे. ती परिस्थितीही जाणते. पण, तिच्यासोबत काही वाईट प्रसंग घडले आहेत. मुंबईत तिला या साऱ्याचा सामना करावा लागला आहे, ज्या कारणामुळे आम्ही तिला शिकण्यासाठी बाहेरगावी पाठवलं आहे. ती जेव्हाही मुंबईत येते तेव्हा आम्ही तिला सुरक्षा व्यवस्थेसोबतच कुठंही बाहेर जाऊ देतो.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kajol Devgan (@kajol)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kajol Devgan (@kajol)

मुलीच्या बाबतीत अतिशय काळजी करणाऱ्या काजोल आणि अजयनं कायमच मुलांना प्रसिद्धी आणि माध्यमांपासून दूर ठेवलं आहे. पण, हल्ली मात्र त्यांची मुलं मोठ्या आत्मविश्वासानं कॅमेरापुढे येताना दिसतात.