दुबईत Aishwarya Rai bachchan चा मोठा सन्मान, पाहा काय घडलं?

ऐश्वर्या राय बच्चन सध्या आंतरराष्ट्रीय दौऱ्यावर आहे. 

Updated: Oct 7, 2021, 08:30 AM IST
दुबईत Aishwarya Rai bachchan चा मोठा सन्मान, पाहा काय घडलं? title=

मुंबई : ऐश्वर्या राय बच्चन सध्या आंतरराष्ट्रीय दौऱ्यावर आहे. ती पती अभिषेक बच्चन आणि मुलगी आराध्यासोबत परदेशात आहे. तिथे ती कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. यासह, ती काही असाइनमेंट देखील पूर्ण करत आहे. ऐश्वर्याने आता दुबई एक्सपो 2020 मध्ये भाग घेतला आहे.

दुबईहून ऐश्वर्या राय बच्चनचे फोटो व्हायरल 

या कार्यक्रमातील ऐश्वर्या राय बच्चनची फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ती लॉरियल पॅरिसची ब्रँड अॅम्बेसेडर असल्याने तिने दुबई एक्स्पो 2020 मध्ये भाग घेतला. स्टँड-अप अगेन्स्ट स्ट्रीट हैरेसमेंट ( Stand-up Against Street Harassment ) या कार्यक्रमाचा ऐश्वर्या भाग बनली. ऐश्वर्या रायचा मेकअप आर्टिस्ट आदित्य शर्माने सोशल मीडियावर अभिनेत्रीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या कार्यक्रमासाठी ऐश्वर्या राय बच्चन काळ्या पारंपारिक पोशाखात दिसली. पोशाख सब्यसाचीने डिझाईन केला होता. अभिनेत्रीच्या हेअरस्टाइलिस्ट जॉर्जने तिच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आणि लिहिले - सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात. हे किती भव्य आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

दुबईपूर्वी ऐश्वर्या राय पॅरिसमध्ये होती. तेथे अभिनेत्रीने पॅरिस फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉक केला. ऐश्वर्या रायच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तिचा आगामी चित्रपट 'पोन्नीयन सेल्वन' आहे. हा सिनेमा मणिरत्नम तयार करत आहेत. ऐश्वर्या रायने गुरु आणि रावणमध्ये दिग्दर्शकासोबत काम केले आहे.

या सिनेमात अभिनेत्री दुहेरी भूमिका साकारणार असल्याचे वृत्त आहे. त्याचं ग्रे शेड पात्र असेल. हा चित्रपट कल्की कृष्णमूर्ती यांच्या 1955 च्या पोन्नीयन सेल्वन या कादंबरीवर आधारित आहे.