'आयुष्यात सर्व काही....', बाबा झाल्यानंतर नयनताराच्या पतीची पोस्ट चर्चेत

नयनतारा आणि विघ्नेश शिवन  हे जुळ्या मुलांचे आई-वडील झाले आहेत.  

Updated: Oct 13, 2022, 03:40 PM IST
'आयुष्यात सर्व काही....', बाबा झाल्यानंतर नयनताराच्या पतीची पोस्ट चर्चेत title=

मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार नयनतारा (Nayanthara)आणि तिचा पती विघ्नेश शिवन (Vignesh Shivan) हे आई-वडील झाले आहेत. या जोडप्याने जुळ्या मुलांचे स्वागत केले आहे. विघ्नेश आणि नयनतारानं त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या जोडप्यानं चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. नेटकऱ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. आयुष्यात नव्या पाहुण्यांची एन्ट्री झाल्यानंतर विघ्नेशने एक पोस्ट शेअर केली आहे. 

इन्स्टाग्रावर एक फोटो पोस्ट करत विघ्नेशने, 'प्रत्येक गोष्ट योग्य वेळ आली की आपल्याकडं येते. संयम ठेवा, आभार माना'. असं त्यानं म्हटलं आहे. सध्या विघ्नेशची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

 

नयनतारा आणि विघ्नेश शिवन यांचं लग्न 9 जून 2022 रोजी चेन्नई येथे झाला. त्यांच्या लग्नाला कुटुंब आणि जवळच्या मित्रांनी हजेरी लावली होती. याशिवाय चित्रपटसृष्टीतील सुपरस्टारही या लग्नात पोहोचले होते. 

सुपरस्टार्सच्या यादीत सुर्या, शाहरुख खान, विजय सेतुपती, एआर रहमान यांचा समावेश होता. लवकरच नयनताराच्या जीवनावर आधारित नेटफ्लिक्सवर एक चित्रपटही प्रदर्शित होणार आहे. 

यामध्ये अभिनेत्रीची प्रेमकहाणी आणि लग्नाबाबत कोणाला माहित नसलेल्या अशा अनेक गोष्टी सांगितल्या जाणार आहेत. या चित्रपटात मुलांचाही उल्लेख असू शकतो असे आता म्हटले जात आहे.