'आहट'नंतर तब्बल 9 वर्षींनी हॉरर मालिका प्रेक्षकांच्या भेटीला; टीझरनेचं उडवली प्रेक्षकांची झोप

टीव्हीवर 'आहट' या हॉरर मालिकेने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना भितीच्या वादळात गुंतवले होते. 2015 मध्ये ही मालिका संपली आणि तिचे अनेक चाहते निराश झाले. पण आता त्यांच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे  'आहट' सारखीच एक नवीन, भयानक हॉरर मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Intern | Updated: Dec 23, 2024, 01:06 PM IST
'आहट'नंतर तब्बल 9 वर्षींनी हॉरर मालिका प्रेक्षकांच्या भेटीला; टीझरनेचं उडवली प्रेक्षकांची झोप title=

New Horror Show Aami Daakini: 'आहट' ही 90 च्या दशकातील एक गाजलेली हॉरर मालिका होती. ती 90व्या दशकात टीव्हीवरील पहिली हॉरर मालिका होती. जीने प्रेक्षकांच्या मनात भीती निर्माण केली. खास करून रात्री ती मालिका पाहणे म्हणजे एक धाडसाचे काम, पण तरीही लोक ती पाहण्यासाठी तासन्तास वाट पाहायचे. त्यातल्या भयानक घटकांनी सर्वांच्याच मनात धडधड वाढवली होती. 'आहट' ही मालिका बंद होऊन 9 वर्षे झाली आहेत, परंतु आता त्या लोकप्रिय शोची जागा घेणारा एक नवा, जबरदस्त हॉरर शो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. शोच्या निर्मात्यांनी नुकताच एक भयानक आणि थोडा मजेशीर टीझर रिलीझ केला आहे, ज्याने हॉरर शो प्रेमींसाठी उत्साह निर्माण केला आहे.

आजकाल चित्रपटांचे सिक्वेल्स आणि जुन्या टीव्ही शोचे नवीन सीझन बनवण्याचा ट्रेंड वाढला आहे. 'C.I.D' चा दुसरा सीझन, 'स्त्री' चित्रपटाचा दुसरा सिक्वेल यावर्षी रिलीज झाला आहे. अशातचं सोनी टीव्हीने आपला जुना शो 'आहट' पुन्हा जागृत करण्यासाठी एक नवीन हॉरर शो 'आमी डाकिनी' सादर करण्याची घोषणा केली आहे.

नवीन शो: आमी डाकिनी- एक भयानक कथा

सोनी टीव्हीने 21 डिसेंबर रोजी आपल्या नवीन हॉरर शो 'आमी डाकिनी' ची घोषणा केली होती. निर्मात्यांनी शनिवारी या शोचा पहिला टीझर रिलीज केला, ज्याने प्रेक्षकांच्या मनात थोडी भीती आणि उत्सुकता निर्माण केली. 'आमी डाकिनी'मध्ये एका डायनची भयानक कथा दाखवली जाणार आहे, जी प्रेमाच्या वाईट शक्तीने जिवंत प्रेत बनलेली आहे.  टीझरच्या सुरुवातीलाच स्पष्टपणे सांगितले आहे की, 'आहट'नंतर सोनी टीव्ही आणखी एक भयानक शो सादर करणार आहे. या शोमध्ये जो भय आणि तणाव आहे, तो पाहताना प्रेक्षकांच्या अंगावर शहारे येतील.

टीझर इतका धक्कादायक आणि आकर्षक आहे की, तो पाहिल्यानंतर तुम्हाला हसू येईल पण नंतर तुम्ही ह्याच शोच्या लाँचची प्रतीक्षा करू लागाल. सोनी टीव्हीच्या 'आमी डाकिनी' या शोची टॅगलाइन आहे - 'ती एक डायन आहे, जी प्रेमात जिवंत प्रेत बनली आहे आणि कोणाचा तरी शोध घेत आहे.'  हा शो हॉरर शो प्रेमींसाठी एक रोमांचक अनुभव असू शकतो कारण त्यात भीतीचे, तणावाचे आणि डोक्याला चक्र फिरवणारे घटक असतील.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

प्रेक्षकांची उत्सुकता आणि शोची लाँच तारीख
या शोच्या लाँच तारीखबद्दल अद्याप काही स्पष्ट माहिती नाही. 'आमी डाकिनी' हा शो नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच 2025 च्या पहिल्या महिन्यात लाँच होईल अशी शक्यता आहे. सोनी टीव्हीच्या 'आहट' या जुन्या शोने 1995 मध्ये सुरूवात केली होती आणि 2015 मध्ये ती मालिकासंपली. त्यानंतर 'आमी डाकिनी' हा शो त्याची जागा घेईल. 

हॉरर शोप्रेमींसाठी या शोने एक भयानक आणि रोमांचक अनुभव देण्याचे निश्चितच वचन दिले आहे. ज्या प्रकारे 'आहट' ने त्याकाळी प्रेक्षकांचे मन जिंकले होते त्याचप्रमाणे 'आमी डाकिनी' देखील प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणार आहे. त्यामुळे या भयानक आणि थरारक शोला पाहण्यासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. 'आहट'च्या चाहत्यांना एक नवीन हॉरर अनुभव मिळणार आहे आणि सोनी टीव्ही त्याची तयारी पूर्णपणे केली आहे.