घरच्यांपासून लपवलं लग्न; आता अभिनेत्री म्हणते, 'मै इसके बच्चे की.... '

सेलिब्रिटी वर्तुळामध्ये काही जोड्या चाहत्यांच्या कायमच आवडीच्या ठरतात. अशाच एका जोडीनं सध्या सोशल मीडियावर अनेकांनाच गोड बातमी दिली आहे. एकत्र स्क्रीन शेअर करण्यापासून ते प्रेमात पडण्यापर्यंत आणि त्यानंतर लग्न करण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास अनेकांनाच हेवा वाटेल असा. 

Updated: Feb 10, 2022, 04:35 PM IST
घरच्यांपासून लपवलं लग्न; आता अभिनेत्री म्हणते, 'मै इसके बच्चे की.... ' title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : सेलिब्रिटी वर्तुळामध्ये काही जोड्या चाहत्यांच्या कायमच आवडीच्या ठरतात. अशाच एका जोडीनं सध्या सोशल मीडियावर अनेकांनाच गोड बातमी दिली आहे. एकत्र स्क्रीन शेअर करण्यापासून ते प्रेमात पडण्यापर्यंत आणि त्यानंतर लग्न करण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास अनेकांनाच हेवा वाटेल असा. 

11 वर्षांच्या त्यांच्या या वैवाहिक नात्यामध्ये आता एका नव्या पाहुण्याची एंट्री होणार असल्यामुळे चाहत्यांमध्येही कमालीचा आनंद पाहायला मिळत आहे. 

लवकरच आपण एका बाळाचं स्वागत करत असल्याचं सांगत या जोडीनं ही बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर केली. 

नात्याच्या एका हळुवार टप्प्यावर असणारी ही जोडी म्हणजे अभिनेता गुरमीत चौधरी (Gurmeet Choudhary) आणि त्याची पत्नी, देबिना बनर्जी. 

ऑनस्क्रीन राम आणि सीतेच्या भूमिकेत झळकलेल्या या जोडीने मंदिरात लग्न केलं होतं. 2 वर्षांपर्यंत त्यांच्या या नात्याची कोणालाही कल्पना नव्हती. 

कुटुंबीयसुद्धा यापासून जवळपास 2 वर्षे अनभिज्ञ होते. ज्यानंतर त्यांनी कुटुंबीयांकडे अखेर नात्याचा उलगडा केला. त्यावेळी समोरून त्यांच्या नात्यावर कोणतीच हरकत दर्शवण्यात आली नव्हती. 

2008 मध्ये गाजवलेली मालिका... 

2008 मध्ये 'रामायण' या मालिकेतून गुरमीत आणि देबिना यांनी राम आणि सीता या मध्यवर्ती भूमिका साकारल्या होत्या. इथूनच त्यांच्या नात्यालाही सुरुवात झाली.

'पति-पत्नी और वो'  या मालिकेच्या सेटवर गुरमीतनं देबिनाकडे प्रेम व्यक्त केलं आणि तिनंही त्याचा स्वीकार केला. 

2017 मध्ये या दोघांनीही दोन मुलींना दत्तक घेतलं होतं अशीही माहिती समोर आली आहे.