'मी भाजी विकत नव्हतो, केवळ मजेखातर तो व्हीडिओ शूट केला'

लॉकडाऊनमुळे अनेकांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालाय. 

Updated: Jun 30, 2020, 03:04 PM IST
'मी भाजी विकत नव्हतो, केवळ मजेखातर तो व्हीडिओ शूट केला' title=

मुंबई: बॉलिवूड अभिनेता जावेद हैदर Javed Hyder  याचा भाजी विकतानाचा एक व्हीडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. लॉकडाऊनमुळे हातात काम नसल्याने Javed Hyder  वर भाजी विकण्याची वेळ आल्याची चर्चा यानंतर रंगली होती. मात्र, आता जावेदनेच Javed Hyder  पुढे येत हा व्हीडिओ खरा नसल्याचे स्पष्ट केले आहे. 

'टाईम्स ऑफ इंडिया'शी बोलतान त्याने सांगितले की, लॉकडाउनदरम्यान स्वत:ला कोणत्या ना कोणत्या कामात बिझी ठेवण्यासाठी मी काही व्हिडीओ शूट केले होते. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही समस्या आहेत. लॉकडाऊनमुळे अनेकांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालाय. काही जण आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलतायत. 

अशा परिस्थितीत लोकांचे मनोरंजन करण्यासाठी मी तो व्हिडीओ शूट केला होता. भाजीविक्रेत्याची परवानगी घेऊन मी त्याच्या हातगाडीवरच हा व्हीडिओ शूट केला. परंतु, हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांचा गैरसमज झाला. अनेकांना मी खरंच भाजी विकत असल्याचे वाटले. मात्र, मी कोणत्याही आर्थिक संकटात नाही. जमा केलेले पैसे लॉकडाउनदरम्यान कामी येत असल्याचे जावेदने सांगितले.  

जावेदने २००९ साली आलेल्या 'बाबर' चित्रपटात काम केले होते. याशिवाय, जेनी और जुजू (२०१२) या मालिकेतही त्याने अभिनय केला होता. खुदगार’ आणि ‘राम जाने’ यांसारख्या चित्रपटांतून बालकलाकार म्हणून जावेदने इंडस्ट्रीत काम करायला सुरुवात केली होती.