Breaking: आमिर खानने सोशल मीडियाविषयी हा निर्णय घेण्याचं धाडस अखेर दाखवलं

 आमिरकडून चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. आज म्हणजेच 15 मार्च रोजी आमिर खानने सोशल मीडिया सोडण्याची घोषणा केली आहे.

Updated: Mar 15, 2021, 05:47 PM IST
Breaking: आमिर खानने सोशल मीडियाविषयी हा निर्णय घेण्याचं धाडस अखेर दाखवलं title=

मुंबई : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने(Aamir Khan) नुकताच आपला 56वा वाढदिवस साजरा केला आहे. पण आज मात्र आमिरने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. आज म्हणजेच 15 मार्च रोजी आमिर खानने सोशल मीडिया सोडण्याची घोषणा केली आहे.

सोशल मीडियावर एक पोस्ट टाकत आमिरने जाहीर केले आहे की, आता मी सोशल मीडियाचा निरोप घेत आहे. आमिरच्या या घोषणेने सर्वांनाच चकित केले आहे.

त्या पोस्टमध्ये त्याने लिहिले की, "माझ्या वाढदिवसा निमित्तने तुम्ही शुभेच्छा दिल्यात त्याबद्दल धन्यवाद. मला खूप आनंद झाला. ही माझी सोशल मीडियावरील शेवटची पोस्ट आहे."

पुढे त्याने लिहिले "akppl_official हा माझा official contact चॅनल असेल. भविष्यात माझ्या आणि माझ्या Movies बद्दलचे सगळे updates तुम्हाला तिथेचं मिळतील."

आमिर खानचा वाढदिवस 14 मार्चला होता. या खास प्रसंगी त्याचा लाल सिंह चड्ढा' (Laal Singh Chaddha) सिनेमाचा नवीन लूक ही सोशल मीडियावर फार चर्चेत राहिला, सर्वांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आमिरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पण आता अभिनेत्याने वाढदिवसाच्या दुसर्‍याच दिवशी चाहत्यांना निराश केलं आहे.