अनिरूद्धला पत्नीसोबत केलेल्या 'या' गोष्टीसाठी वाटतोय पश्चाताप

दोघं एकाच क्षेत्रात असल्यामुळे.....

Updated: Jun 28, 2021, 02:47 PM IST
अनिरूद्धला पत्नीसोबत केलेल्या 'या' गोष्टीसाठी वाटतोय पश्चाताप  title=

मुंबई : 'पत्नीसोबत केलेल्या त्या गोष्टीसाठी मला आजही गिल्टी वाटतंय.', असं म्हणत अभिनेता मिलिंद गवळी यांनी आपल्या मनातील एक खंत चाहत्यांसोबत शेअर केली आहे. मिलिंद गवळी हे मराठी, हिंदी आणि मल्याळम सिनेमातील लोकप्रिय अभिनेते. (Aai Kuthe Kai karte fame Milind Gawali feel guilty for his real wife Deepa Gawali ) पण या दिग्गज कलाकाराच्यामध्येही कधीतरी असुरक्षिततेची भावना आली होती. आपली पत्नी आपल्यापेक्षा पुढे तर निघून जाणार नाही ना? हा विचार एकेकाळी मिलिंद गवळी यांच्या मनात आला. याच तेव्हाच्या विचाराबद्दल त्यांना आजही वाईट वाटत आहे. 

55 वर्षीय मिलिंद गवळी हे आजही तरूण अभिनेत्यांना लाजवतील एवढे तरूण आहेत. मिलिंद गवळी यांची पत्नी दिपा गवळी या देखील अतिशय सुंदर आहेत. मिलिंद गवळी यांनी सुलेखा तळवलकर यांच्या 'दिल के करीब' मुलाखतीत हा किस्सा सांगितला होता. मिलिंद गवळी यांच्या पत्नीला देखील सिनेमाची आणि जाहिरातीची ऑफर आली होती. त्यावेळी त्यांच्या मनात आलेली भावना आता व्यक्त केली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Milind Gawali (@milindgawali)

मिलिंद गवळींनी सांगितला 'तो' किस्सा

मिलिंद गवळी यांना एका ऑडिशनकरता बोलवण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांची पत्नी देखील होती. कास्टिंग डिरेक्टरने दिपा गवळी यांना पाहून 'तू देखील ऑडिशन दे.' त्यावेळी मिलिंद गवळी यांनी देखील त्यांना प्रोत्साहन दिलं. आयडेक्सची जाहिरात दिपा गवळी यांना मिळाली. 

शुटिंगच्या पहिल्या दिवशी दिपा गवळीसह मिलिंद आपल्या 3 महिन्याच्या मिथिलाला घेऊन गेले. शुटिंग पूर्ण झाल्यावर दिपा गवळी यांनी आपल्याला हे नाही करायचं. मला या क्षेत्रात काम नाही करायचं. हे ऐकल्यावर मिलिंद गवळी यांनी देखील फार जबरदस्ती केली नाही. ही जर अभिनय क्षेत्रात पुढे गेली तर माझं काही खरं नाही. दोघं एकाच क्षेत्रात असल्यामुळे घराकडे फार लक्ष देता आलं नसतं. कुठेतरी ती इनसिक्युरिटी त्यावेळी माझ्या मनात आली होती. त्यामुळे मी ही तिला फार प्रोत्साहन दिलं नाही. आणि तिला पण या क्षेत्रात करिअर करायचं नव्हतं. 

अभिनेता मिलिंद गवळी 'आई कुठे काय करते?या मालिकेत अनिरूद्ध देशमुखची भूमिका साकारतात. या भूमिकेने पुन्हा एकदा मिलिंद गवळी यांचं वेगळेपण अधोरेखित केलं आहे.