मुंबई : आपल्याला तर हे माहित आहे की, घर आणि महागड्या गाड्यांच्या किंमती या फार जास्त असतात. ज्या सर्व सामान्यांना परवडणाऱ्या नसतात. परंतु त्याच किंमतीत एक व्हि़स्की विकली जातेय, ज्याची किंमत कोटींच्या घरात आहे. तुम्हाला ऐकूण त्यावर विश्वास जरी बसत नसला तरी ही गोष्ट खरी आहे. आज आम्ही तुम्हाला जगातली सगळ्यात महागडी म्हणजेच 10 कोटींच्या व्हिस्कीची ओळख करुन देणार आहोत. स्कॉटलंडमध्ये एक अशी व्हिस्की आहे जी जगप्रसिद्ध आहे. त्यात आता ह्या व्हिस्कीची भर पडलीये.
"द इंट्रेपिड" असं या व्हिस्कीचं नाव आहे, ही जगातली सगळ्यात मोठी व्हिस्कीची बाटली आहे. या बाटलीला जगभरातून प्रचंड मागणी आहे, नुकताच स्कॉटलंडमध्ये या बाटलीचा लिलाव झाला, व्हिस्की जगभरात प्रचंड लोकप्रीय आहे, बऱ्याच वेगवेगळ्या व्हिस्कीच्या ब्रँडने वेगवेगळ्या देशात अनेक रेकॉर्ड बनवलेत.
"द इंट्रेपिड" नावाची व्हिस्कीची बाटली 5 फुट 11 इंच लांब आहे. 10 लाख 84 लाखांना ही बाटली विकली गेली.
सप्टेंबर 2021 मध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील या व्हिस्कीचं नावं नोंदवण्यात आलं आहे. त्यात 82.16 यूएस गॅलन म्हणजेच 311 लिटर एवढी व्हिस्की आहे.
बाजारात मिळणाऱ्या 444 व्हिस्कीच्या बाटल्यां मिळवून ही एक बाटली बनेल म्हणजेच याचे 5,287 पेग बनू शकतील, एवढी मोठी ही बाटली आहे,
विशेष म्हणजे "द इंट्रेपिड" तब्बल 32 वर्षे जुनी आहे. या बाटलीला 32 वर्षे मॅकलनच्या स्पाईसाईट या गोदामात साठवून ठेवली होती.
दारूबद्दल असे म्हणतात की, ती जितकी जुनी तितकी ती अधिक चवदार असते. त्यामुळे रसिक मंडळी त्यासाठी वाटेल ती किंमत मोजण्यास तयार असतात.
युरोप, अमेरिकेत तर दारूचे विविध प्रकार दीर्घ काळासाठी साठवून ठेवले जातात. या राखून ठेवलेल्या दारूला मोठी किंमत मिळते. द इंट्रेपिड नावाने ओळखली जाणारी ही बाटलीसुद्धा जुणी असल्याने तीला 10 कोटींचा भाव मिळालाय.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये गेल्या वर्षी ह्या बाटलीच नावाचा समावेश करण्यात आला होता. तर या लिलावात मिळालेल्या किमतीतून 25 टक्के रक्कम मेरी क्युरी धर्मादाय संस्थेला दान केली जाणार आहे.