प्रेमाचा वाढदिवस खास करण्यासाठी पहिल्यांदा झिंग चढेपर्यंत प्यायली दारू, त्यानंतर Viagra घेतली आणि...

Weird News UK: ब्रिटनमधील एका जोडप्याच्या आयुष्यात धक्कादायक प्रकार घडला आहे. या जोडप्याला एक चूक चांगलीच महागात पडली आहे. लिव्हरपूलमध्ये राहणारं जोडपं प्रेमाचा तिसरा वाढदिवस साजरा करण्यासाठी उत्साहित होतं.

Updated: Oct 30, 2022, 03:59 PM IST
प्रेमाचा वाढदिवस खास करण्यासाठी पहिल्यांदा झिंग चढेपर्यंत प्यायली दारू, त्यानंतर Viagra घेतली आणि... title=

Weird News UK: ब्रिटनमधील एका जोडप्याच्या आयुष्यात धक्कादायक प्रकार घडला आहे. या जोडप्याला एक चूक चांगलीच महागात पडली आहे. लिव्हरपूलमध्ये राहणारं जोडपं प्रेमाचा तिसरा वाढदिवस साजरा करण्यासाठी उत्साहित होतं. 'द सन' मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, रॉब अँड्र्यूज (Rob Andrews)याने त्याची 25 वर्षांची गर्लफ्रेंड इसाबेला वुल्फसह (Isabella Woolf)  प्रेमाचा तिसरा वाढदिवस साजरा करण्यासाठी जोरदार तयारी केली होती. यासाठी दोघांनी दारुसह खाद्यपदार्थांची सोय केली होती. संगीत आणि प्रकाशयोजनेची उत्तम व्यवस्था होती. शहरापासून दूर असलेल्या हॉटेलमध्ये रूम बुक केली होती. तसेच दिवस खास करण्यासाठी तिच्यासोबत भरपूर सामान घेऊन हॉटेलमध्ये पोहोचला होता. आनंद आणि उत्साहात दोघांनी झिंग चढेपर्यंत दारू प्यायली. त्यानंतर ऑनलाइन व्हायाग्राची (Viagra) ऑर्डर केली. 

आनंदाच्या भरात त्यांनी काही तासांतच दारूच्या तीन बाटल्या प्यायल्या. त्यानंतर व्हायग्रा खाल्ल्यानंतर दोघेही एकमेकांच्या जवळ आले आणि आकंठ प्रेमात बुडाले. मात्र या दरम्यान नको तेच झालं. जवळीक साधत असताना प्रियकर रॉबचा प्रायव्हेट पार्ट फ्रॅक्चर झाला. त्यानंतर तातडीने रुग्णवाहिका बोलावण्यात आली आणि त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले.

Video: सात वर्षांच्या मुलीनं पहिल्यांदाच ऐकला आवाज, Reaction पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

रुग्णालयात उपचार केल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. योग्य वेळी योग्य उपचार मिळाल्याने रॉब बरा झाला. डॉक्टरांनी सांगितलं की, प्रायव्हेट पार्ट फ्रॅक्चरच्या घटना क्वचितच घडतात, पण अनेक वेळा लाजेखातर लोकं हॉस्पिटलमध्ये येत नाहीत. पण अशी चूक करणे हे घातक ठरू शकतं. 2021 मध्ये देखील यूकेमध्ये एका व्यक्तीसोबत अशीच घटना घडली होती. ज्याचा अहवाल ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित झाला होता.