Weird Tradition : 'या' जमातीत स्त्रिया असतात सर्वात सुंदर! नवरा बायकोला पाहुण्यांसोबत सांगतो झोपायला, 70 टक्के मुलांचे वडील 'हे'...

Weird Himba Tribe : या जगात अशा अनेक जमाती आहेत, ज्या त्यांच्या अनोख्या आणि विचित्र परंपरेमुळे ओळखल्या जातात. या जमातीतील स्त्रिया अतिशय सुंदर असतात. तर नवरा बायकोला पाहुण्यांसोबत झोपायला लावतो. इथल्या प्रथा ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. 

नेहा चौधरी | Updated: Nov 29, 2023, 10:10 PM IST
Weird Tradition : 'या' जमातीत स्त्रिया असतात सर्वात सुंदर! नवरा बायकोला पाहुण्यांसोबत सांगतो झोपायला, 70 टक्के मुलांचे वडील 'हे'... title=
this tribe women are the most beautiful Husband asks wife to sleep with guests himba tribe free physical relation with guest

Weird Himba Tribe : एकविसाव्या शतकात आज जग खूप पुढे गेल आहे. सर्व सुखसुविधा, अत्याधुनिक गोष्टीसह भरपूर पैसा...पण या जगात असा अनेक जमाती आहे ज्यांची आपण कल्पनाही करु शकत नाही. आजही त्यांच्याबद्दल ऐकलं किंवा पाहिलं तर आपल्याच डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. तिथल्या चालीरीती, प्रथा इतक्या विचित्र असतात ज्या ऐकून आपल्या धक्का बसेल. (this tribe women are the most beautiful Husband asks wife to sleep with guests himba tribe free physical relation with guest)

या जमाती आजही जगापासून कोसो दूर आहेत. जंगलात दूर दुर्मिळ भागात आणि आजही ते त्यांचं जग जगतात. ज्यात खूप विचित्र आणि भयानक रीतिरीवाज पाळतात. अशीच एक जमात आहे ती म्हणजे हिंबा. ही जमात आफ्रिकन देशातील नामिबियाच्या कुनेन प्रांतात राहतात. हा भाग जगातील सर्वात दुर्मिळ भागात राहतात. 

विचित्र प्रथा 

या जमातीतील मुली त्यांच्या लग्नाच्या दिवशीच आंघोळ करतात. कदाचित यामागील कारण त्या भागातील पाण्याची समस्या असू शकते. विशेष म्हणजे हिंबा जमातीच्या स्त्रिया आंघोळ करत नाहीत पण तरीही त्यांच्या अंगातून वास येत नाही. यासाठी या महिला एक खास प्रकारची पेस्ट वापरतात. तेलात खनिजातील धूळ मिक्स करुन ती ते अंगाला लावतात. या पेस्ट लावल्यामुळे महिलांचं उन्हापासून बचाव होतो. त्यासोबत शरीराला कीटकांपासूनही बचाव होतो. या लेपामुळे या जमातीच्या स्त्रियांचा रंग हलका लाल दिसतो. 

महिलांची जीवन असतं कठीण!

जमातीच्या महिलांचं जीवन खूप कठीण आहे. महिलांना टोळीतील पुरुषांपेक्षा जास्त कष्ट करावं लागतात. या महिलांना जनावरं सांभाळणं, लाल मातीपासून तयार केलेले घर, स्वयंपाक करणे, साफसफाई करणं, मुलांची काळजी घेणं यापेक्षा अनेक कामं महिलांना करावी लागतात. 

परपुरुषांसोबत शारीरिक संबंध...

हिंबा जमातीच्या महिला सर्वात सुंदर मानल्या जातात. या जमातीत आणखी विचित्र परंपरा आहे, इथलो लोक त्यांच्या आदरातिथ्यासाठी ओळखलं जातात. त्यांच्या घरी येणाऱ्या पाहुण्यांना त्यांच्या पत्नींसोबत शारीरिक संबंध ठेवण्याची परवानगी असते. त्या रात्री नवरा दुसऱ्या खोलीत किंवा घराबाहेर झोपतात. हिंबा जमातीत एकापेक्षा जास्त स्त्रियांशी संबंध ठेवण्याचे स्वातंत्र्यदेखील आहे. तर महिला इतर पुरुषांसीही शारीरिक संबंध ठेवू शकतात. या जमातीतील लोकांची संख्या सुमारे 50 हजार एवढी आहे.