Baby Bump Photoshoot : आपण जेवढा विचार करत नाही तेवढा बदल जगभरात दिसून येत आहे. जगभरात अशा गोष्टी घडताना दिसत आहेत. ज्या समाजामध्ये चुकीच्या मानल्या जात होत्या. सध्या त्याच गोष्टी ट्रेंड होत आहेत. असाच एक प्रकार आपल्या शेजारी असणाऱ्या देशात म्हणजेच चीनमध्ये घडताना दिसत आहे. जो पाहून तुम्हाला देखील धक्का बसेल. सध्या चीनमधील सोशल मीडियावर हा प्रकार खूप चर्चेत आला आहे.
शेजारी असणाऱ्या चीन देशातील समाज देखील भारतीय समाजाप्रमाणे काही नैतिक मूल्यांचे पालन करताना दिसत आहे. चीनमध्ये आता असा ट्रेंड सुरु झाला आहे, जो अनेक जणांना मान्य नाहीये. ज्यामध्ये चीनमधील काही मुली अविवाहित असताना देखील प्रेग्नेंट राहून फोटोशूट करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर त्यांच्या या फोटोशूटची जोरदार चर्चा सुरु आहे. पण याचा त्या मुलींवर काहीही परिणाम होत नाहीये.
फोटोशूटसाठी मुली होत आहेत 'प्रेग्नेंट'
साउथ चाइना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, सोशल मीडियावर काही तरुणी आणि अविवाहित मुली प्रेग्नेंट होऊन फोटोशूट करताना दिसत आहेत. या मॅटर्निटी फोटोशूटमध्ये त्या बनावट बेबी बंप लावून खरे फोटोशूट करत आहेत. जेन -जींचा हा नवा ट्रेंड पाहून चीनमधील पालकांना देखील मोठा धक्का बसला आहे. हा प्रीमेड मॅटर्निटी फोटोशूट ट्रेंडिंग सुरू झाला जेव्हा चीनी प्रभावशाली 'Meizi Gege'ने ते सोशल मीडियावर पोस्ट केले. त्यांच्या 57 लाख फॉलोअर्सनी ते पाहिले.
चीनमधील मुली असं का करत आहेत?
चीनमधील मुलींच्या या फोटोशूटच्या मागे मुलींचा असा तर्क आहे की, त्या अजून काही दिवस लग्न करणार नाहीत. पण त्यांना त्यांच्या प्रेग्नेंसी फोटोशूटमध्ये स्लिम आणि सुंदर दिसायचे आहे. जर या मुली 30 व्या वर्षी प्रेग्नेंट राहिल्या तर त्यांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडतील. पण त्या 26 व्या वर्षी तरुण दिसतील. त्यामुळे चीनमधील मुली आधीच तिचे फोटोशूट करून घेत आहेत. त्यानंतर जेव्हा त्या प्रेग्नेंट होतील तेव्हा हेच फोटो त्या शेअर करतील. त्यावर सोशल मीडियावरील नेटकऱ्यांनी त्यांना अंत्यसंस्कारसाठी मृतदेह बनून फोटोशूट करण्याचा सल्ला दिला आहे. नाहीतर वयाच्या 70 व्या वर्षी वाढदिवसाचे फोटोशूट करून घ्यावे.