संयुक्त अमिरात : दुबईत पावसाने कहर माजला. त्यामुळे पुरस्थिती निर्माण झाली आहे. दुबईच्या इंटरनॅशनल एअरपोर्टवरही रनवेवर पाणी साचले आहे. त्यामुळे विमानांने उड्डाण घेताना मोठ्या अडचणी निर्माण झाल्या. एअर इंडियाची चार उड्डाणे रद्द करावी लागल्याची माहिती एअर इंडियाचे प्रवक्ते धनंजय कुमार यांनी दिली. गुरुवारी आणि शुक्रवारी गडगडाट जोरदार पाऊस झाला. तसेच शनिवारीही विजांसह गारांचा पाऊस पडला. जोरदार वारे आणि मुसळधार पावसाने दुबईत एकच तारांबळ उडाली.
तर दुसरीकडे दुबईत पावसाने कहर माजवला. पुरस्थिती निर्माण झाली आहे. तर तिकडे सौदी अरबमध्ये बर्फवृष्टी सुरु आहे. हा ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम असल्याचे सांगितले जात आहे. जगातल्या सर्वाधिंक थंडी असणाऱ्या भागांमध्ये तर हाडे गोठवणारी थंडी आहेच, पण सौदीसारख्या उष्ण आणि ओसाड भागांमध्येही बर्फवृष्टी सुरु असल्याने आश्चर्य व्यक्त होते आहे.
शुक्रवारी जॉर्डनच्या सीमेजवळील सौदी अरेबियाच्या काही भागात शुक्रवारी बर्फ पडले. तर इजिप्तमधील अलेक्झांड्रियासारख्या प्रदेशातील इतर भागात, लेबनॉन आणि सिरिया येथे बर्फाचे वादळ झाले. तसेच गारपीट झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
युएईमध्ये पुन्हा पाऊस झाला. रात्री अमिरातीच्या पश्चिम भागात मुसळधार ते मध्यम पाऊस पडला. अबू धाबी आणि अल धफ्रा भागातही गारपीट, गडगडाटासह विजांचा कडकडाट झाला. शुक्रवारी हलका पाऊस पडला. परंतु ७० किमी / तासाच्या वेगाने जोरदार वारे वाहत होते. विशेषत: किनारपट्टीच्या भागात समुद्रसपाटीपासून समुद्रात नऊ फूट उंची लाटा उसळल्या होत्या.
ग्रीसमध्ये मोठ्या प्रमाणात थंडी पडली आहे. नागरिकांना थंडीसोबतच वादळाचाही सामना करावा लागत आहे. डोंगराळ भागांमध्ये मोठ्या प्रमाणात बर्पवृष्टी होते. तर तिकडे चीनमध्येही हेनान प्रांतात थंडीने कहर माजवला. कित्येक भागांमध्ये उणे ४० अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. तलाव, झरे गोठून गेले आहेत.