Railway Ticket : पाकिस्तानात कधी काय होईल काही सांगता येत नाही. सध्या पाकिस्तानमध्ये अनेक गोष्टींवरून खळबळ उडाल्याचं दिसून येतं. अलीकडेच, माजी पंतप्रधान इम्रान खान आणि पंतप्रधान कार्यालय यांच्यासह सत्ताधारी पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझच्या अनेक नेत्यांकडून ऑडिओ लीक (Audio Leak) झाला होता. त्यानंतर या प्रकरणावरून मोठा गदारोळ झाला. त्यानंतर आता रेल्वेमध्ये (Pakistan Railway Ticket) चक्क सेक्सची सुविधा असल्याचं तिकीट व्हायरल झालं आहे.
30 सप्टेंबर रोजी काही प्रवासी प्रवास करण्यासाठी रेल्वे स्थानकावर गेले. त्यावेळी त्यांनी तिकीट देखील घेतलं. मात्र, तिकीटावर जे पाहिलं, त्यावरून मोठा गोंधळ उडाला. तिकीटावर 'एसी क्लासमध्ये सेक्स सेवा उपलब्ध आहे', असा मॅसेज लिहून आला. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.
ही बाब उघडकीस आल्यानंतर प्रवाशांनी तिकीट कॉऊंटरवर गोंधळ घातला. प्रवाशांनी याची माहिती तिकीट व्यवस्थापनाला देखील दिली. त्यानंतर अधिकारी टेन्शनमध्ये आले. अधिकाऱ्यांनी रेल्वेने तिकीट सिस्टीम सुधारण्यास सुरुवात केली, परंतु सर्व काही सुरळीत होण्याआधीच हे पाकिस्तान रेल्वेचे तिकीट सोशल मीडियावर व्हायरल झाले.
मीडिया रिपोर्टनुसार, पाकिस्तानची तिकीट सिस्टीम हॅक (Pakistan Railway Ticket System Hack) झाली होती. याबाबत पाकिस्तानी पत्रकार हमीद मीर यांनी ट्विट करून माहिती दिली. थल एक्सप्रेसची तिकीट सिस्टीम हॅक झाली होती. ही यंत्रणा खासगी कंत्राटदाराकडे आहे. रेल्वे तिकीट सिस्टीम हॅक झाली होती पण आता ती परत मिळवून हॅकर्सपासून मुक्त करण्यात आली आहे, अशी माहिती देण्यात पाकिस्तानी पत्रकाराने दिली होती.
جناب اس ٹکٹ پر جن سہولیات کا ذکر ہے اسکی وجہ یہ ہے کہ کل تھل ایکسپریس کا ٹکٹنگ سسٹم ہیک ہو گیا تھا یہ سسٹم ایک پرائیویٹ کنٹریکٹر کے پاس ہے اس نے ریلوے اور ایف آئی اے کو تحریری طور پر شکائت کی ہے کہ اسکا سسٹم ہیک کر لیاگیا تھا لیکن اب سسٹم کو ہیکر کے شکنجے سے آزاد کروا لیا گیا ہے https://t.co/mJBHnXCWL6 pic.twitter.com/y1pLaci0ua
— Hamid Mir (@HamidMirPAK) October 1, 2022