New York City: 375 वर्षांपासून पृथ्वीवरुन सुमद्रात बुडालेला 8वा खंड संशोधकांनी शोधून काढला आहे. अशातच आता पृथ्वीवर अस्तित्वात असलेले शहर जमीनीत गाडले जाण्याची भिती व्यक्त केली जात आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहर हळू हळू जमिनीत दबलं जात आहे. नासाने नुकताच एक अहवाल जारी केला. या अहवालात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. यूयॉर्क शहर हळू हळू जमिनीत दबलं जात असल्याने यामुळे लागार्डिया विमानतळ, आर्थर अॅश स्टेडियम तसेच कोनी बेटाला सर्वप्रथम धोका निर्माण होवू शकतो.
न्यूयॉर्क पोस्टने याबाबतचे वृत्त दिले. नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरी आणि रटगर्स युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी न्यूयॉर्कजवळील शहरांमधील अनेक प्रमुख ठिकाणे शोधली आहेत जी हळूहळू जमिनीत दबली जात आहेत. 2016 ते 2023 पर्यंत लागार्डिया विमानतळाचा रनवे आणि आर्थर अॅशे स्टेडियम अनुक्रमे 3.7 आणि 4.6 मिलिमीटर प्रति वर्ष इतक्या गतीने जमिनीत दबले जात आहे. हे दोन्ही क्षेत्र पूर्वीच्या लँडफिल साइटवर बांधले गेले होते. न्यूयॉर्क शहरालगतच्या समुद्राच्या पातळीत वाढ आहे. यामुळे न्यूयॉर्क शहर समुद्रात बुडण्याचा गंभीर धोका देखील वाढत आहे. चक्रीवादळ आणि अतिउष्णकटिबंधीय वादळांमुळे किनारपट्टीवरील पूर यामुळे न्यूयॉर्क शहर धोकादायक स्थितीत आले आहे.
न्यूयॉर्क शहरचा जो भाग जमिनीत दबला जात आहे त्यात गव्हर्नर्स आयलंडचा दक्षिणेकडील भाग, स्टेटन आयलंडमधील मिडलँड आणि साउथ बीच आणि दक्षिण क्वीन्समधील समुद्र किनारी आर्व्हर्न यांचा समावेश आहे. या वर्षाच्या सुरुवातीला युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे केला होता. या संशोधनातून एक अहवाल समोर आला. न्यूयॉर्क शहरातील 1 दशलक्षाहून अधिक इमारतींचे वजन अंदाजे 1.7 ट्रिलियन पौंड आहे. इमारतींच्या वजनामुळेच न्यूयॉर्क शहर हळूहळू जमिनीत दबलं जात असल्याची धक्कादायक माहिती संशोधनातून समोर आली आहे.
न्यूयॉर्क शहर समुद्र किनाऱ्यावर वसलेले आहे. यामुळे मोठी नैसर्गिक आपत्ती आल्यास न्यूयॉर्क शहराचा बचाव कसा करावा यावर नियोजन करण्याची गरज आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये किनाऱ्यावरील लोकसंख्येचे आणि मालमत्तेचे मोठे नुकसान होवू शकते.