70 वर्षीय व्यक्तीच्या 12 बायका, 102 मुले आणि 578 नातवंडे! कुटुंबातील 700 जणांची नावं लक्षात राहत नसल्याने बनवला रजिस्टर

जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा असं आपण गमतीने म्हणतो. पण असचं काहीस चित्र युगांडा या देशात पहायला मिळेल. युगांडातील 70 वर्षीय व्यक्तीच्या 12 बायका, 102 मुले आणि 578 नातवंडे असा भला मोठा परिवार आहे. 

वनिता कांबळे | Updated: Dec 26, 2024, 06:41 PM IST
70 वर्षीय व्यक्तीच्या 12 बायका, 102 मुले आणि 578 नातवंडे! कुटुंबातील 700 जणांची नावं लक्षात राहत नसल्याने बनवला रजिस्टर   title=

 Ugandan Man Fathered 102 Children With 12 Wives : लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेक देशात कुटुंब नियोजन योजना राबवल्या जात आहेत.  प्रजनन दर कमी होत असतानाही जगातील अनेक देश अतिलोकसंख्येच्या समस्येमुे त्रस्त आहेत. अशातच युगांडामधील एक 70 वर्षीय व्यक्ती  102 मुलांचा पिता आहे.  

हे देखील वाचा... किंमत 5500000000; 'या' देशाकडे आहे पृथ्वीवरील सगळ्यात महागडं हत्यार; देशाचे नाव ऐकून शॉक व्हाल

मोसेस हसैया कसारा असे 102 मुलांचा पिता असलेल्या व्यक्तीचे नाव आहे. मोसेस हसैया कसारा हा पूर्व युगांडातील मुकीजा गावचा रहिवासी आहे. मोसेस हसैया कसारा याने तब्बल 12 महिलांशी विवाह केला आहे. या 12 पत्नीपासून त्याला 102 मुलं झाली आहेत. तसेच त्याच्या अनेक मुला मुलांची लग्न झाली असून तो 578 नातवंडाचा आजोबा देखील आहे. सध्या मोसेस हसैया कसारा  याचा परिवार सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

मोसेस हसैया कसारा याला त्याच्या प्रत्येक पत्नीपासून सरासरी 8 ते 9 मुल झाली आहेत. मुलांची संख्या वाढल्याने त्याने आपल्या अनेक पत्नींना गर्भनिरोधक गोळ्या देण्यास सुरुवात केल्याचेही एका मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे.  मोसेस हसैया कसारा याचे पहिले लग्न 1972 मध्ये झाले होते, जेव्हा तो फक्त 17 वर्षांचा होता. यानंतर त्याने एकामागून एक 12 महिलांशी लग्न केले. त्याला 12 पत्नींपासून 102 मुल झाली आहेत. मोसेस हसैया कसारा याच्या परिवारात 700 पेक्षा जास्त लोक राहत आहेत. मोसेस

मोसेस  हसैया कसारा हाच कुटुंब प्रमुख आहे. एवढ्या मोठ्या कुटुंबाचे पालन पोषण करणे हा त्याच्यासाठी खूप मोठा टास्क आहे. कुटुंबाततील महिला सदस्य घरातील सर्व मिळून करतात. तर, तरुण मुलं उदर्निर्वाहासाठी शेती तसेच इतर कामे करतात. 
1995 मध्ये युगांडा देशात बालविवाहावर बंदी घालण्यात आली आहे. देशाने बहुपत्नीत्वाला कायदेशीर मान्यता दिली आहे. पुरुषांना धार्मिक आणि पारंपारिक चालीरीतींनुसार अनेक पत्नींशी लग्न करण्याची परवानगी दिली आहे. 2014 मध्ये, युगांडातील 8.3% स्त्रिया आणि 7.1% पुरुष बहुपत्नीक संबंधात होते. अहवालानुसार, युगांडाचा जन्मदर जगातील सर्वात जास्त आहे. यामुळे कुटुंबांमध्ये अनेक मुल होतात.