लंडन : दारु ही एक अशी गोष्ट आहे, जी माणसाला दानव बनवू शकते आणि हे त्या व्यक्तीच्या लक्षात देखील येत नाही. कधी कधी व्यक्तीच्या दारुच्या अती सेवनामुळे दुसऱ्याच निर्दोष व्यक्तीला शिक्षा भोगावी लागते. दारुसंबंधीत अशीच एक घटना समोर आली आहे. यामध्ये एक व्यक्ती दारुच्या नशेत आपल्या गर्लफ्रेंडच्या जीवशी खेळला, परंतु त्याला हे कळले देखील नाही आणि त्याला जेव्हा हे कळलं तेव्हा वेळ निघून गेली होती.
एक व्यक्ती त्याच्या गर्लफ्रेंडच्या फ्लॅटवर गेला. तेथे तो भरपूर दारू प्यायला. हा व्यक्ती तेथे एक किंवा दोन नव्हे तर चक्कं 24 बिअर प्यायल्या. यानंतर त्या व्यक्तीने त्याच्या गर्लफ्रेंडसोबत संबंध बनवले आणि या दरम्यान असे काही घडले की, त्याच्या गर्लफ्रेंडने जागीच आपला जीव सोडला. सकाळी कित्येक तासांनंतर जेव्हा हा व्यक्ती शुद्धीवर आला, तेव्हा त्याच्या लक्षात आले की, त्याची गर्लफ्रेंड बेडवर नग्न अवस्थेत पडलेली आहे.
हे प्रकरण इंग्लंडमधील डार्लिंग्टनचे आहे. येथे 32 वर्षीय सॅम पायबस हा त्याची गर्लफ्रेंड सोफी मॉसच्या फ्लॅटवर गेला. सॅम पायबस विवाहित होता. आणि सोफी दोन मुलांची आई होती आणि तिचे सॅमसोबत संबंध होते. हे दोघेही एकमेकांशी लैंगिक संबंधात होते.
पायबस त्या दिवशी त्याच्या गर्लफ्रेंडसोबत तिच्या फ्लॅटमध्ये गेला. तो 24 बिअर प्यायल्या आणि नंतर त्याच्या गर्लफ्रेंडसोबत त्याने जवळीक साधली.
या दरम्यान, सॅम पायबसने त्याच्या मैत्रिणीच्या मानेवर दबाव आणला ज्यामुळे तिचा गुदमरुन जीव गेला आणि पायबसला ते कळलेही नाही. नशेच्या अवस्थेत तो झोपला. जेव्हा तो दुसऱ्या दिवशी सकाळी उठला तेव्हा त्याला सोफी बेडवर मृतावस्थेत आढळली.
सॅमला हे आठवत नव्हते की, त्याने नक्की असे काय केलं किंवा त्यांच्यासोबत असं काय घडलं ज्यामुळे त्याच्या गर्लफ्रेंडचा जीव गेला. त्यानंतर सॅमने पोलिसांना मदतीसाठी धाव घेतली आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आत्मसमर्पण केले आणि संपूर्ण घटना सांगितली.
डेलीमेलच्या अहवालानुसार, पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून सोफीचा मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी तिचे पोस्टमॉर्टम केलं, ज्यामध्ये गुदमरल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे उघड झाले.
या प्रकरणात, टीसाइड क्राउन कोर्टाने दोषीला म्हणजेच सॅमला 5 वर्षांची शिक्षा सुनावली, ज्यावर अटर्नी जनरलने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ज्यानंतर दोषींच्या शिक्षेत वाढ होऊ शकते.
सॅमने टीसाइड क्राउन कोर्टला सांगितले की, काही मिनिटांसाठी गळ्यावर दबाव आल्यामुळे हे घडले. सकाळच्या सुमारास त्याला या घटनेची माहिती मिळाली, जेव्हा तो शुद्धीवर आला. आता सॅमच्या शिक्षेत किती वाढ करावी हे न्यायालय ठरवणार आहे.