जपानमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा; पुणेकरांशी खास कनेक्शन

जपानमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारला जाणार आहे. 

वनिता कांबळे | Updated: Feb 18, 2025, 04:52 PM IST
जपानमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा; पुणेकरांशी खास कनेक्शन

Shiv Jayanti 2025 : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची गाथा थेट सातासमुद्रापार पोहचणार आहे.  जपानची राजधानी टोकियो येथे  छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा बसविण्यात येणार आहे. पुण्यातून शिवरायांचा पुतळा थेट जपानला जाणार आहे. जपानमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारले जाणार आहे. या स्मारकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हा भव्य पुतळा ठेवला जाणार आहे. 

जपानमध्ये छत्रपती शिवाजी महाराज भव्य यांचे स्मारक उभारण्यात येत आहे. या स्मारकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा  8 फूट उंचीचा अश्वारूढ पुतळा स्थापण्यात येणार आहे. या पुतळ्याचे वजन 250 किलो इतके असेल.  'आम्ही पुणेकर' या संस्थेच्या वतीने येत्या आठ मार्च रोजी महिला दिनाच्या निमित्ताने जपानची राजधानी टोकियो येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक उभा करण्यात येणार आहे. ज्येष्ठ शिल्पकार विवेक खटावकर यांनी हा पुतळा बनवला आहे. हा पुतळा जपानला पाठवण्याआधी शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने देशातील एकूण 12 राज्यांमध्ये या पुतळ्याची भव्य मिरवणुक काढण्यात येणार आहे

छत्रपती संभाजीनगरमध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी तलवार चालवली

छत्रपती संभाजीनगरमध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी तलवार चालवली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने शिवजन्मोत्सव सोहळ्यात मराठेकालीन साहसी खेळांचं प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली. ही प्रात्यक्षिकं पाहत असताना अंबादास दानवेंना साहसी खेळाचा मोह आवरला नाही. त्यांनी हातात तलवार घेत तलवार बाजी केली. यावेळी जय भवानी, जय शिवाजी... हर हर महादेव, असा जयघोष करण्यात आला.

कल्याणमध्ये शिवजयंतीनिमित्त शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची 40 फुटांची रांगोळी साकारली. खडकपाडा येथील रॉक माउंट बिल्डिंग इथं ही भव्य रांगोळी साकारण्यात आली. शिक्षक विद्यार्थ्यांनी तब्बल चार ते पाच तास मेहनत घेऊन ही कलाकृती पूर्ण केली. यावेळी दरवर्षी असे वेगवेगळे उपक्रम राबवत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले

सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त महिलांनी कपाळावर शिवरायांची प्रतिमा साकारली आहे. शिवाजी महाराजांची जयंती वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरी होतेय...  तर  वसंत विहार भागातील शिवभक्त महिला कपाळावर  प्रतिमा साकारत अनोख्या पद्धतीने शिवजयंती साजरी करत आहेत.