बीजिंग : चीनला जोरदार भूकंपाचा धक्का बसलाय. या भूकंपाची तीव्रता ६.५ रिस्टरस्केल नोंदवली गेली. चीनच्या नैऋत्यकडच्या भागात झालेल्या भूकंपात १०० पर्यटक फसले आहेत. तर ७ लोकांचे बळी गेले आहेत.
चीनच्या नैऋत्यकडच्या भागाला जोरदार भूकंपाचा धक्का बसल्याचे वृत्त एएफपी या वृत्तसंस्थेने दिले आहे. परंतु झिनहुआ न्यूज एजन्सीच्या माहितीनुसार, सध्या ७ जणांचा मृत्यू झाल्याचे म्हटलेय. या भूकंपनात ६० जण जखमी झाल्याचे म्हलेय. तर ३० जण गंभीर आहेत.
चीनच्या आपत्ती नियंत्रण विभागाने या भूकंपात १०० जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली आहे, असं वृत्त एएफपीने दिलेय. मात्र, हे सर्व पर्यटक असल्याचे म्हटले जात आहे. भूकंपामुळे जवळपास १ लाख ३० हजार घरांचे नुकसान झाल्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, ४१ वर्षांपूर्वी २८ जुलै १९७६ मध्ये चीनमध्ये८.३ तीव्रतेने भूकंप झाला होता. या भूकंपात लाखो लोकांचा मृत्यू झाला होता. राजधानी बीजिंगच्या उत्तर-पूर्वमध्ये स्थित तांगशान शहर उद्ध्वस्त झाले होते. तर दोन हजार लोकांचा मृत्यू झाला होता.