नवी दिल्ली : कोरोनानंतर आता वर्क फ्रॉम होम हळूहळू कमी होऊन पुन्हा ऑफिस सुरू झाले आहेत. कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. याचं कारण म्हणजे आता 5 दिवस ऐवजी 4 दिवसांचा आठवडा होणार आहे. टीसीएस पाठोपाठ आणखी एक बड्या कंपनीने आठवड्याचे तीन दिवस सुट्टी देण्याचा विचार केला आहे.
टीसीएसपाठोपाठ आणखी एका कंपनीने 4 दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय घेतला आहे. जगभरात या कंपनीच्या निर्णयाची चर्चा होत आहे. पॅनासोनिक कंपनीने कर्मचाऱ्यांना आठवड्यातील 3 दिवस सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. ही जपानी कंपनी आहे. या कंपनीच्या धाडसी निर्णयामुळे सध्या तिची चर्चा होत आहे.
कंपनीने कर्मचाऱ्यांना ज्यादा सुट्ट्या न घेण्यासाठी प्रोत्साहन दिलं आहे. याशिवाय एक सुट्टी ज्यादा देऊन त्यांनी काहीतरी वेगळे कोर्स करावेत, कुटुंबासोबत वेळ घालवावा या दृष्टीने देण्यात आली आहे.
सध्या हा निर्णय प्रायोगित तत्वावर घेतला असून त्यातून काम आणि त्याचे फायदे किती होतात हे पाहणार आहे. यावर हा निर्णय कायमस्वरुपी ठेवायचा की नाही याबाबत कंपनी अंतिम निर्णय घेईल. जपानमध्ये सध्या Hitachi, Mizuho Financial Group, Fast Retailing, Uniqlo सारख्या बड्या कंपन्यांनी 4 दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय घेतला आहे.