जगाचा विनाशाची सुरुवात... 2025 वर्ष अत्यंत धोकादायक! बाबा वेंगा आणि नास्त्रेदमस यांची भयानक भविष्यवाणी

2025 वर्ष कसे असेल? कोणत्या संकटांचा सामना करावा लागेल. याबाबत बाबा वेंगा आणि नास्त्रेदमस यांची भयानक भविष्यवाणी केली आहे. 

वनिता कांबळे | Updated: Oct 23, 2024, 12:06 AM IST
जगाचा विनाशाची सुरुवात... 2025 वर्ष अत्यंत धोकादायक! बाबा वेंगा आणि नास्त्रेदमस यांची भयानक भविष्यवाणी title=

Baba Vanga Nostradamus Predictions For 2025:  2024 हे वर्ष संपायला आचा फक्त दोन महिने शिल्लक राहिले आहेत. अशातच 2025 वर्ष कसे असेल याबाबत भाकित वर्तवली जाऊ लागली आहेत. 2025 या वर्षात जगाचा विनाश सुरु होईल. 2025 वर्ष अत्यंत धोकादायक असेल. भविष्यवेते बाबा वेंगा आणि नेस्त्रदमस यांनी भयानक भविष्यवाणी केली आहे.

बाबा वेंगा आणि नास्त्रेदमस यांनी 2025 या वर्षाबाबत वर्तवलेल्या भविष्यवाण्या सोशल मिडियावर व्हायरल झाल्या आहेत. 2025 हे वर्षात जगाच्या विनाशाला सुरुवात होईल असे भाकित वर्तवले जात आहे. फ्रेंच ज्योतिषी नास्त्रेदमस यांनी 2025 या वर्षाबाबत भयानक भाकीत केले आहे. 2025 मध्ये युरोपात मोठा विनाश होईल आणि युरोपातील मध्यवर्ती भागाला याचा फटका बसेल. बल्गेरियन बाबा वेंगा यांनी देखील विनाशकारी युद्धाचा इशारा दिला आहे.

काय आहे बाबा वेंगाची भविष्यवाणी ?

2025 मध्ये मोठ्या प्रमाणावर विनाश होईल, ते जगासाठी संकटाचे वर्ष असेल अशी भविष्यवाणी बाबा वेंगा यांनी केली आहे. 2025 मध्ये पृथ्वीवर अपरिचीत प्राणी दिसतील. तसेच  टेलिपॅथीचा विकास पहायला मिळेल असेही बाबा वेंगा यांनी म्हंटले आहे. नेत्रहीन असलेल्या वेंगा बाबांचा 1996 साली मृत्यू झालाय. मात्र त्याआधीच त्यांनी या भविष्यवाणी करून ठेवल्यात. विशेष म्हणजे ही भाकितं कुठेही लिखित स्वरुपात नाहीत. आपल्या शिष्यांना त्यांनी हे सगळं भविष्य ऐकवलंय. त्यांचे काही आडाखे खरे ठरले, तर काही चुकीचे निघालेत.

काय आहे नास्त्रेदमस यांची भविष्यवाणी ? 

सध्या सुरू असलेले रशिया-युक्रेन युद्ध संपेल, कारण दोन्ही सैन्य थकेल अशी भविष्यवाणी नास्त्रेदमस यांनी केली आहे.  ब्राझीलमध्ये ज्वालामुखीचा उद्रेक होईल. तसेच विनाशकारी पूराचे भाकीतही त्यांनी वर्तवले आहे. नास्त्रेदमसची भविष्यवाणी आतापर्यंत 70 टक्के खरी ठरलीय. नास्त्रेदमसच्या भविष्यवाणीवर सारं जग विश्वास ठेवतं. कारण त्यानं वर्तवलेली बरीचशी भाकितं खरी ठरली आहेत. नास्त्रेदमसने त्याच्या पुस्तकात एकूण 6 हजार 338 भाकितं वर्तवली आहेत.