Time Traveler 2023 Prediction : 2023 मध्ये एलियन्स (Aliens) आणि पृथ्वीवरील लोकांमध्ये युद्ध होईल असा दावा एका टाईम ट्रॅव्हलरने केला होता. त्याच्या या दाव्यामुळे खळबळ उडाली होती. यानंतर आणखी एका टाईम ट्रॅव्हलरने देखील भयानक दावा केला आहे. 2023 या वर्षात पृथीवर भयानक घडना आहेत. या घटना नेमक्या कधी घडणार आहेत. याच्या तारखाच या टाईम ट्रॅव्हलरने सांगितल्या आहेत. या टाईम ट्रॅव्हलरने आपन भविष्यातील 2858 सालातून परत आल्याचा दावा केला आहे.
हे दावे करणाऱ्या टाईम ट्रॅव्हरलचे डार्कनेस timetraveller नावाने Tiktok वर अकाऊंट आहे. Tiktok वर व्हिडिओ शेअर करत याने 2023 मध्ये काय घडणार याचे भाकीत केले आहे. सावधान! असं म्हणत त्याने लोकांना अलर्ट केले आहे. भविष्यातील 2858 या वर्षात प्रवास करुन आलेला मी रिअल टाइम प्रवासी आहे असा दावा त्याने या व्हिडिओत केला आहे. 2023 मध्ये येणार्या या 5 तारखा लक्षात ठेवा असं तो व्हडिओमध्ये म्हणत आहे. या वर्षाच्या अखेरीस मंगळावर मानवी हाडे सापडतील असा दावा या टाईम ट्रॅव्हलरने केला आहे.
एलियनपासून अंतराळापर्यंतच्या सर्व विषयांवर भविष्यातील घटनांबद्दल त्याने अनेक दावे केले आहेत. 28 फेब्रुवारीला शत्रू एलियन्सची एक प्रजाती पृथ्वीचा ताबा घेईल. 30 मार्च- वर्महोलमधून विमान बेपत्ता होईल. प्रवाशांसाठी हा थरार 6 सेकंदाचा असेल तर इतर सर्वांसाठी 6 वर्षेांचा कालावधी असेल. 4 मे रोजी मंगळावर मानवी हाडे सापडतील. 2 ते 6 जुलै दरम्यान सूर्याच्या अति उर्जेतून मानवाला महासत्ता प्राप्त होईल. 19 ऑगस्ट रोजी सरकारच्या सर्वोच्च गुप्त योजनेवर काम करणारे शास्त्रज्ञ समांतर जगाशी संपर्क साधण्यासाठी एक पोर्टल उघडतील. या टाईम ट्रॅव्हलरने तारखेनिशी घडणाऱ्या घटनांचे भाकित केले आहे.
beyondtimetraveller नावाने Tiktok वर त्याच्या प्रोफाइल असलेल्या आणखी एका टाईम ट्रॅव्हलरने अशाच प्रकारचा दावा केला होता. एलियन्स आपल्या दिशेने येत आहेत. एलियन आणि मानव यांच्यात अंतराळ युद्ध सुरू होणार आहे. 18 मार्च 2023 रोजी विस्लार, अलास्का येथे 8.1 तीव्रतेचा भूकंप होईल. भयंकर आपत्ती येईल. 26 जून 2023 पॅसिफिक महासागरात ब्लू व्हेलपेक्षा मोठा प्राणी सापडेल हा प्राणी 350 फूट लांब असेल. 1 ऑक्टोबर 2023 रोजी गोलोथ नावाची एक प्रजाती दिसेल. जे मानवापेक्षा कितीतरी जास्त बुद्धिमान असेल असे दावे या टाईम ट्रॅव्हरले केले आहेत.
या टाईम ट्रॅव्हलरने केलेल्या दाव्यांवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. याबाबत लोकांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. बहुतांश लोक टाईम ट्रॅव्हलरच्या दाव्याची खिल्ली उडवत आहेत.