...अन् 84 लाखांत खरेदी केलेल्या रोबोट कुत्र्याने भुंकण्याऐवजी युट्यूबरवर आग ओकली, पुढे काय झालं पाहा

अमेरिकन युट्यूबरने चीनमधून विकत घेतलेल्या रोबोट कुत्र्याचा रिव्ह्यू शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, पण यामागील कारण मात्र वेगळं आहे.   

शिवराज यादव | Updated: Sep 3, 2024, 06:52 PM IST
...अन् 84 लाखांत खरेदी केलेल्या रोबोट कुत्र्याने भुंकण्याऐवजी युट्यूबरवर आग ओकली, पुढे काय झालं पाहा title=

अमेरिकन युट्यूबर IShowSpeed आपल्या अतिशयोक्ती स्वभाव आणि स्टंटमुळे नेहमी चर्चेत असतो. तो नेहमीच जगावेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो. यादरम्यान अनेकदा त्याची फजितीही होते. हे सर्व व्हिडीओ तो सोशल मीडियावर शेअर करत असतो, जे व्हायरल होत असतात. नुकतंच त्याने चीनमधून विकत घेतलेल्या रोबोट कुत्र्याचा रिव्ह्यू केलेला व्हिडीओ शेअर केला आहे. तब्बल 84 लाखात त्याने हा रोबोट खरेदी केला आहे. पण जेव्हा IShowSpeed त्याला भुंकण्यास सांगितलं तेव्हा त्याने आग ओकण्यास सुरुवात केली. यामुळे IShowSpeed लाही आश्चर्याचा धक्का बसला. 

या व्हिडीओला 45 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यू मिळाले आहेत. व्हिडीओत IShowSpeed रोबोट कुत्र्याचं टेस्टिंग करताना दिसत आहे. यामध्ये कुत्राही कमांड फॉलो करत बस सांगित्यावर बसत असून, हस्तांदोलन करताना दिसत आहे. 

युट्यूबरने यावेळी ब्लॅकफ्लिप करत कुत्र्यालाही तसंच करायला सांगतो. कुत्रा कॉपी करताना उडी मारताना दिसत आहे. पण जेव्हा IShowSpeed त्याला भुंकण्यास सांगतो तेव्हा अनपेक्षित प्रकार घडतो. कुत्रा भुंकण्याऐवजी आग ओकण्यास सुरुवात करतो. यामुळे आश्चर्यचकित झालेला युट्यूबर शेजारी असणाऱ्या स्विमिंग पूलमध्ये उडी मारतो. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by IShowSpeed (@ishowspeed)

YouTube वर त्याने याचा सविस्तर व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये नेमकं काय झालं होतं हे दिसत आहे. यात IShowSpeed ​​उत्सुकतेने रोबोट कुत्र्याला अनबॉक्सिंग करून विविध कमांड्ससह सेट अप करताना दिसत आहे. रोबोट कुत्रा सुरुवातीला प्रतिसाद देत नाही. नंतर एका क्षणी, तो अगदी आग ओकण्यास सुरुवात करतो. ज्यामुळे YouTuberला धक्का बसतो. नंतर मित्राच्या मदतीने, तो अखेरीस हाय-टेक मशीन कसे चालवायचे हे शोधण्यात यशस्वी होतो.

दरम्यान या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी आपला विश्वासच बसत नसल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी हा डॉग रोबोट नाही तर ड्रॅगन रोबोट असल्याचं म्हटलं आहे. एकाने म्हटलं आहे की, "हा थोडा धोकादायक आहे. हा आगीने मालकाचा चावा घेतो". तर एकाने पण या कुत्र्याचं नेमकं उद्दिष्ट काय? तो आग का ओकतोय? अशी विचारणा केली आहे.