दर दिवशी 6,00,00,000 रुपये दान करते 'ही' व्यक्ती; नेमकी किती आहे एकूण श्रीमंती?

Shiv Nadar Networth: कधीकाळी एकाच दिवसात 46 हजार कोटी गमावणारी व्यक्ती आज दिवसभरात करते 6,00,00,000 कोटींचं दान. नाव माहितीये?   

Updated: Jan 15, 2025, 01:17 PM IST
दर दिवशी 6,00,00,000 रुपये दान करते 'ही' व्यक्ती; नेमकी किती आहे एकूण श्रीमंती? title=

Shiv Nadar Net worth: भारतात कित्येक कैक कोटींची श्रीमंती असलेले अनेक धनाढ्य व्यावसायिक आहेत ज्यांनी भारताला व्यावसायिक क्षेत्रात उल्लेखनीय उंचीवर नेऊन ठेवलं. मुकेश अंबानी, गौतम अदानी, कुमार मंगलम बिर्ला ही त्यातलीच काही नावं. आपल्या व्यसायाचा इतका मोठा डोलारा सांभाळत ही श्रीमंत मंडळी समाजकार्यालासुद्धा तितकंच महत्त्वं देतात. आर्थिक मदतीचा हात पुढे करुन हे व्यावसायिक मोठं दानधर्मही करत असतात. 

मागील वर्षीच सर्वाधिक दान करण्याऱ्यांच्या यादीत अशाच एका मोठ्या व्यावसायिकाचं नाव समोर आलं. एचसीएलचे चेअरमन शिव नाडर यांनी सर्वाधिक दान केल्याचं या यादीवरुन स्पष्ट झालं. देशातील कैक अब्जाधीशांच्या वेगवेगळ्या विभागातील जसे की आयटी, पोर्ट, टेलिकॉम मधील अनेक कंपन्या असतात. मात्र, लोकांच्या नजरेत व्यावसायिकांचा आर्थिक फायदा जरी दिसत असला तरी त्यांना अनेकदा कोट्यवधींचं नुकसानही सहन करावं लागतं. 

डिसेंबरमधील निकालानंतर आर्थिक घट

भारतीय शेअर बाजारात मंगळवारी भारतातील एका अब्जाधीशाला 46 हजार 485 रुपयांचा मोठा तोटा झाला. त्यांच्या कंपनीचे शेअरची किंमत ही 9 टक्क्यांनी घसरल्यामुळे त्या कंपनीला इतका मोठा तोटा सहन करावा लागला. ज्या कंपनीला हे इतकं मोठं नुकसान झालं त्या कंपनीचे सर्वेसर्वा आहेत शिव नाडर. एका दिग्गज आयटी कंपनी एचसीएल टेक्नॉलॉजीचे (HCL Tech) ते मालक आहेत. कंपनीच्या डिसेंबर तिमाहीच्या निकालानंतर एचसीएल टेकच्या मार्केट कॅपमध्ये घट झाली. एचसीएलच्या निकालामुळे गुंतवणूकदारांमध्ये  फारसा उत्साह दिसू शकला नाही आणि त्यातच शेअर्स विकण्यास सुरुवात झाली.

शिव नाडर यांची एकूण संपत्ती 3 लाख 40 हजार 793 कोटी रुपये 

बीएसईवर मंगळवारी एचसीएलचा शेअर 8.63 टक्क्यांनी घसरुन 1 हजार 813.95 वर थांबला. एचसीएलचे शेअर हा बीएसई सेंसेक्स आणि एनएसईवर सर्वात जास्त घसरणारा शेअर ठरला. ट्रेडिंग सेशनदरम्यान एका टप्प्यावर, बीएसईवर 9.41 टक्क्यांनी शेअर घसरून एक हजार 798.40 रुपयांवर आला. एनएसईवर शेअर 8.51 टक्क्यांनी घसरून एक हजार 819.95 रुपये प्रति शेअर झाला. 14 जानेवारी रोजी बंद झालेल्या ट्रेडिंग सेशनमध्ये एचसीएलचे मार्केट कॅप 4 लाख 92 हजार 245 कोटी रुपयांवर घसरले. परंतु, एचसीएलच्या मार्केट कॅपमध्ये मोठी घट होऊनही, फोर्ब्सनुसार, शिव नाडर यांची संपत्ती 39.4 अब्ज अमेरिकन डॉलर्स म्हणजेच 34 लाख 793 कोटी रुपये आहे.

हे ही वाचा: मुकेश अंबानींच्या खेळीत फसले Airtel, Vi! आणला 50 रुपयांहून स्वस्त प्लान...
 

दररोज दान केले 5.9 कोटी

एचसीएल ही कंपनी देशातील सर्वात मोठ्या सॉफ्टवेअर सर्विस पुरवणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे. तसेच, या कंपनीचे मालक शिव नाडर हे सर्वात दानधर्म करणारे व्यायसायिक आहेत. अ‍ॅडेलगिव-हुरून इंडिया फिलँथ्रॉपीच्या 2024 वर्षातील यादीमध्ये 79 वर्ष यशस्वी कारकीर्द असलेल्या या कंपनीने 2 हजार 153 कोटी रुपये दान केल्याची माहिती आहे. ही यादी नोव्हेंबर 2024 मध्ये प्रकाशित केली गेली. कौतुकाची बाब म्हणजे शिव नाडर हे गेल्या पाच वर्षांत तिसऱ्यांदा देशातील सर्वात मोठे देणगीदार ठरले आहेत.

एचसीएलच्या शेअरची आजची परिस्थिती

एचसीएल टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांमधील अधिक किंमत 2 हजार 11 रुपये आहे आणि सर्वात कमी ही एक हजार 235 रुपये आहे. मंगळवारी शेअर एक हजार 813.95 रुपयांवर बंद झाला. मात्र बुधवारी शेअरमध्ये किंचित वाढ दिसून येत आहे. बुधवारी सकाळी शेअर्समध्ये किंचित वाढ झाल्यानंतर एचसीएलचे मार्केट कॅप 4 लाख 92 हजार 475 कोटी रुपये झाले.