होंडाने सादर केली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर, जाणून घ्या किंमत

होंडाने आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरवरून टोकियो मोटर शोमध्ये पडदा उठवला आहे. होंडाने या नव्या स्कूटरचं नाव PCX Electric असं ठेवलं आहे.

Updated: Oct 31, 2017, 03:59 PM IST
होंडाने सादर केली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर, जाणून घ्या किंमत title=
Image Credit - canadamotoguide.com

नवी दिल्ली : होंडाने आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरवरून टोकियो मोटर शोमध्ये पडदा उठवला आहे. होंडाने या नव्या स्कूटरचं नाव PCX Electric असं ठेवलं आहे.

या स्कूटरमध्ये १.३३ हॉर्सपावरची इलेक्ट्रिक मोटर आणि लिथियम आयर्न मोबाईल बॅटरी पॅक लावण्यात अलंय. या बॅटरी पॅकचं नाव मोबाईल पावर पॅक आहे.   

स्कूटरची लांबी १,९२३एमएम, रूंदी ७४५एमएम आणि उंची १,१०७एमएम आहे. जपानी टू व्हिलर कंपनी होंडाने पीसीएक्स हायब्रिडला सुद्धा या मोटार शोमध्ये सादर केले. यात १५० सीसीचं सिंगल सिलेंडर फ्यूल इंजेक्टेड इंजिन लावण्यात आलंय. 

दरम्यान, आतापर्यंत ही माहिती समोर आली नाही की, या दोन्ही स्कूटर्स ऑटो एक्सपो २०१८ मध्ये लॉन्च केल्या जाणार की नाही. भारतात होंडाची ही पहिली प्रिमियम स्कूटर आहे. होंडाच्या अ‍ॅक्टिव्हापेक्षाही जास्त या स्कूटरची किंमत असणार आहे. भारतात पुढील वर्षी या स्कूटर लॉन्च केल्या जाऊ शकतात. होंडा पीसीएक्स इलेक्ट्रिक स्कूटरची अंदाजे किंमत ८५ हजार रूपये मानली जात आहे.