चांगल्या स्मार्टफोनच्या प्रतीक्षेत आहात? Google चा ढासू फोन ठरेल Best Option

हा स्मार्टफोन चाल्क, चारकोल आणि सेज या शेडमध्ये उपबल्ध असेल

Updated: May 27, 2022, 08:25 AM IST
चांगल्या स्मार्टफोनच्या प्रतीक्षेत आहात? Google चा ढासू फोन ठरेल Best Option  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : जवळपास दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर आता, गुगलकडून त्यांचा पिक्सल 6 A हा फोन भारतात आणण्यास सज्ज झालं आहे. 'Soli Radar chip' च्या काही तांत्रित कारणास्तव या फोनचं भारतात येणं लांबलं होतं. किंबहुना थांबलं होतं. पण, आता मात्र कंपनीकडून हा फोन 2022 या वर्षात भारतात विक्रीसाठी उपलब्ध असेल असं सांगण्यात आलं. (Google Pixel 6a to arrive in india after 2 years gap)

फक्त भारतातच नव्हे, तर नव्यानं लाँच करण्यात आलेला Pixel 6a ऑस्ट्रेलिया, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, आयर्लंड, इटली, जपान, पोर्तोरिको, सिंगापूर, स्पेन, तैवान, युके आणि युएसमध्ये लाँच होणार आहे. 

भारतात या फोनची किंमत नेमकी किती असणार आहे, यावरून पडदा उठलेला नाही. पण, हा फोन वन प्लसही विसरायला लावेल असं म्हणायला हरकत नाही. 

Google to bring Pixel 6a to India after gap of 2 years

हा स्मार्टफोन चाल्क, चारकोल आणि सेज या शेडमध्ये उपबल्ध असेल. मेन आणि अल्ट्रावाईड लेन्ससह या फोनला दोन रिअर कॅमेरा असणार आहेत. तर, लाईव्ह कॅप्शन आणि लाईव्ह ट्रान्सलेशन असेही फिचर यामध्ये असणार आहेत. पूर्ण दिवस चालणारा हा फोन बॅटरी सेवर मोडवर असताना 72 तास टिकणार आहे. जुलै 21 च्या सुमारास तुम्हाला या स्मार्टफोनची प्री ऑर्डर करता येणार आहे.