मुंबई : भारत संचार निगम अर्थात बीएसएनएलने मोठा धमाका केला आहे. केवळ ३५ रुपयांच्या पॅकमध्ये ५ जीबी डेटा देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे या पॅकवर ग्राहकांच्या उड्या पडण्याची शक्यता आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बीएसएनएलने आपल्या जुन्या प्लानमध्ये बदल करत नवीन प्लान बाजारात आणले आहेत. कारण खासगी टेलिकॉम कंपन्यांना टक्कर देण्यासाठी ही बीएसएनएलची धडपड दिसत आहे. दरम्यानस बीएसएनएल नवीन ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत असल्याचे समोर येत असून फेब्रुवारी २०१९ मध्ये कंपनीने जवळपास ९ लाख नवीन ग्राहकांना जोडले होते.
बीएसएनएलने ३५ रुपयांच्या स्पेशल टॅरिफ प्लानमध्ये बदल केलाय. या प्लानमध्ये पूर्वी युजर्सना २०० एमबी डेटा मिळत होता. आता नव्या प्लाननुसार युजर्सना ५ जीबीचा डेटा मिळणार आहे. म्हणजेच पूर्वीपेक्षा २५ पट अधिक जास्त डेटा मिळणार. मात्र, पूर्वीप्रमाणे प्लानची वैधता ५ दिवसांची असणार आहे. तसेच ५३ रुपयांच्या स्पेशल टॅरिफ व्हावचरमध्येही बदल केलाय. या प्लाननुसार, पूर्वी युजर्सना २१ दिवसांच्या वैधतेसह २५० एमबी डेटा मिळत होता. नव्या प्लाननुसार, युजर्सना ८ जीबीचा डेटा मिळणार आहे. मात्र, वैधता २१ दिवसांऐवजी १४ दिवसाची करण्यात आली आहे.
बीएसएनएलच्या ३९५ च्या रुपयांच्या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि फ्री नॅशनल रोमिंग (मुंबई आणि दिल्ली वगळता) मिळेल. त्याशिवाय युजर्सना प्रत्येक दिवशी २ जीबी डेटा मिळेल. या प्लानची वैधता ७१ दिवसांची आहे.