बीएसएनएलचा नवा प्लान, ९० दिवसांत दररोज मिळणार ५ जीबी डाटा

 बीएसएनएलने बुधवारी तीन नवीन प्लान लॉन्च केलेत. मात्र, काही ठराविक सर्कलसाठी आहेत. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 3, 2017, 01:11 PM IST
बीएसएनएलचा नवा प्लान, ९० दिवसांत दररोज मिळणार ५ जीबी डाटा title=

नवी दिल्ली : सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने बुधवारी तीन नवीन प्लान लॉन्च केलेत. मात्र, काही ठराविक सर्कलसाठी आहेत. कंपनीने २५८ रुपये, ३७८ रुपये आणि ५४८ रुपये असे तीन पॅक जारी केलेत. यातील दोन प्लान पंजाब आणि गुजरात सर्कलसाठी आहेत. सर्कलनुसार प्लानची किंमत वेगवेगळी असण्याची शक्यता आहे. नव्या प्लान नुसार ९० दिवसांत दररोज ५ जीबी डाटा मिळणार आहे.

अशी असेल नवी ऑफर

- २५८ रुपयांची योजना - यात ग्राहकाला २२० रुपयांचा टॉकटाइम, ११० प्री ऑन-नेट वॉईस कॉलिंग ( बीएसएनएल ते बीएसएनएल). याची ३० दिवस वैधता
- ३७८ रुपयांची योजना - ३७८ रुपयांचा कॉम्बो पॅक यात ४ जीबी प्रतिदिन डेटा, एक दिवसात ४ जीबी टेडा संपला की ८० केबीपीएस स्पीड मिळेल. अनलिमिटेड कॉलिंग सुविधा आणि ऑफ नेटसाठी ३० मिनिटे प्रतिदिन मिळणार, ३० दिवसांची वैधता
-५४८ रुपयांची योजना - ९० दिवस म्हणजेच ३ महिन्यांसाठी ५ जीबी टेडा प्रतिदिन मिळेल. टेडा लिमिट संपल्यानंतर ८० केबीपीएस स्पीड मिळेल. यात व्हाईस कॉलिंग सुविधा मिळणार नाही.