'तुमच्या कार गुणवत्तेची कल्पना नसणाऱ्यांसाठी', तरुणाच्या पोस्टला आनंद महिंद्रांचं सडेतोड उत्तर; 'तुमच्या असभ्यपणाचा...'

महिंद्राने नुकतंच आपल्या दोन नव्या इलेक्ट्रिक कार लाँच केल्या आहेत. यानिमित्ताने कंपनी चर्चेच असतानाच एका युजरने कंपनीच्या कार डिझाईन आणि सर्व्हिस क्लालिटीवर टीका केली आहे.   

शिवराज यादव | Updated: Dec 3, 2024, 03:56 PM IST
'तुमच्या कार गुणवत्तेची कल्पना नसणाऱ्यांसाठी', तरुणाच्या पोस्टला आनंद महिंद्रांचं सडेतोड उत्तर; 'तुमच्या असभ्यपणाचा...' title=

सध्याचं सोशल मीडियाचं (Social Media) युग असल्याने जर एखादी कंपनी, प्रोडक्टसंबंधी तक्रार करायची असेल तर थेट त्या कंपनीला टॅक करुन आपलं मत कळवता येतं. असंच एका युजरने महिंद्राच्या गाड्यांसंबंधी असणारी आपली तक्रार एक्सवरुन थेट आनंद महिंद्रा यांच्याकडे मांडली आहे. त्याने कंपनीच्या कारची डिझाईन, सर्व्हिस क्वालिटी आणि विश्वसनीयतेवर टीका केली आहे. तसंच हुंडाईशी त्यांच्या कारची तुलनाही केली आहे. विशेष म्हणजे आनंद महिंद्रा यांनी या टीकेला उत्तर दिलं आहे.  महिंद्राने नुकतंच BE6e आणि XEV 9e या आपल्या दोन नव्या इलेक्ट्रिक कार लाँच केल्या आहेत. यानिमित्ताने कंपनी चर्चेच असतानाच ही टीका करण्यात आली आहे. 

एक्सवर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये युजरने लिहिलं आहे की, "तुमचं प्रत्येक प्रोडक्ट त्यांच्यासाठी आहे जे योग्य अभ्यास आणि रिसर्च करत नाहीत. जेव्हा दिसण्याचा विषय येतो, तेव्हा तुमच्या कार हुंडाईच्या आसपासही नसतात. मला काही कल्पना नाही जर तुमच्या डिझाईन टीम किंवा तुमची स्वत:ची इतकी वाईट निवड आहे का? पण गांभीर्याने सांगायचं झाल्यास तुमच्या गाड्या त्यांच्यासाठी आहेत ज्यांना माउंटन साइज कार हवी आहे आणि विश्वासार्हता आणि गुणवत्तेची कल्पना नाही”.

युजरने सांगितलं की, महिंद्राच्या कारमध्ये सौंदर्याचं आकर्षण आणि विश्वासार्हतेचा अभाव आहे. त्याने काही डिझाईन्सला शेण म्हटलं आहे. आतापर्यंत फक्त निराशाच झाली असल्याचं सांगत त्याने पोस्टचा शेवट केला. 

आनंद महिंद्रा यांनी दिलं उत्तर

आनंद महिंद्रा यांनी या टीकेकडे दुर्लक्ष करण्याऐवजी डिलीट कऱण्यात आलेल्या या पोस्टचा स्क्रीनशॉट शेअर करत उत्तर दिलं आहे. कंपनीला अजून बराच पल्ला गाठायचा आहे हे मान्य करताना आनंद महिंद्रांनी तज्ज्ञांनी कंपनीला "कार व्यवसायातून बाहेर पडण्याचा" सल्ला दिला तेव्हा 1990 पासून महिंद्रा किती पुढे आली आहे याचा विचार करण्याची आठवण करून दिली.

"जेव्हा मी 1991 मध्ये कंपनीत सामील झालो तेव्हा अर्थव्यवस्था नुकतीच खुली झाली होती," असं आनंद महिंद्रा यांनी सांगितलं. “जागतिक सल्लागार कंपनीने आम्हाला कार व्यवसायातून बाहेर पडण्याचा सल्ला दिला होता. कारण त्यांच्या मते, परदेशी ब्रँडशी स्पर्धा करण्याची आमच्याकडे कोणतीही संधी नव्हती. तीन दशकांनंतरही, आम्ही आजूबाजूला आहोत आणि तीव्र स्पर्धा देत आहोत.”

थेट युजरला संबोधित करताना, त्यांनी नमूद केले की कंपनीने सर्व “निंदकता, संशयवाद आणि अगदी तुमच्या पोस्टमधील असभ्यपणाचा वापर आमची यशाची भूक पूर्ण करण्यासाठी वापरली आहे.”

त्यांनी आत्मसंतुष्टतेसाठी जागा नाही आणि सतत सुधारणा करण्यासाठी वचनबद्ध आहोत असंही म्हटलं आहे. तसंच आमच्या मनात संताप भरल्याबद्दल टीकाकाराचे आभार मानून समारोप केला.

टीका करणारा युजर आनंद महिंद्रा यांनी उत्तर दिल्याने भारावला. “ओएमजी हे खूप गोड आहे. तुम्ही टीका रचनात्मकपणे घेतली याचा मला आनंद आहे. तुमच्या टीमच्या कॉलनंतर मला ट्विट डिलीट करावे लागले कारण मला वाटले की ते कठोर शब्दांमुळे नाराज आहेत.” आपले शब्द चुकीचे होते असंही त्यांनी म्हटलं.