नामदेव ढसाळांचा इशारा
शिवसेना, भाजप आणि रिपाई यांच्यात मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी जागावाटपावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर रिपाईच्या वाट्याला आलेल्या जागांबाबत वादाला तोंड फूटलं आहे. नामदेव ढसाळ यांनी आमच्या रामदास आठवले यांना आमच्या जागांबाबत ११ तारखेपर्यंत निर्णय घ्या असा निर्वाणीचा इशारा दिला.
Jan 9, 2012, 03:20 PM ISTमहायुतीतील जागा वाटपाचा तिढा कायम
रामदास आठवले ३० जागांवर ठाम राहिल्याने महायुतीतील जागा वाटपाचा तिढा अद्याप कायम आहे. महायुतीच्या जागा वाटपात शिवसेना-भाजपने आठवलेंच्या रिपाईला २९ जागांचा प्रस्ताव दिला. रिपाईच्या कोट्या संदर्भातही वादाला तोंड फूटलं आहे. नामदेव ढसाळांनी रिपाईच्या कोट्यातील पाच जागा मिळाव्यात अशी मागणी केली आहे. तसंच ढसाळांनी रामदास आठवलेंना या संदर्भात निर्णय घेण्यासाठी ११ जानेवारी पर्यंतची मुदत दिली आहे
Jan 9, 2012, 12:36 PM ISTआठवले घेरणार पंतप्रधानांना ?
इंदू मिल प्रश्नावर आरपीआयमध्ये श्रेयाच्या लढाईवरुन वाद सुरु असताना आज आरपीआयचे नेते रामदास आठवले वरळी इथं जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहेत. आठवले यांनी वरळी इथं आपण इंदू मिल प्रश्नाबाबत कसे प्रयत्न केले याचा पाढाच वाचला.
Jan 7, 2012, 04:06 PM ISTRPIच्या नेत्यांना मस्ती चढली आहे- नामदेव ढसाळ
आरपीआयच्या नेत्यांना मस्ती चढली आहे असं जळजळीत विधान नामदेव ढसाळ यांनी केलं आहे. यापुढे दलित पँथर आरपीआयमध्ये राहणार नाही अशी घोषणाही ढसाळांनी केली. तसंच माझी नाराजी शिवसेनेवर नाही असंही त्यांनी सांगितलं.
Jan 6, 2012, 09:59 AM ISTमहायुतीच्या जागा वाटपाचा तिढा सुटणार ?
शिवसेना, भाजपा आणि रामदास आठवलेंची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या तीन पक्षांच्या महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. सेना आणि भाजपाने आठवलेंच्या रिपाईला २५ जागा सोडण्याचा प्रस्ताव दिला आहे. तर रामदास आठवलेंनी ३० जागांची मागणी केली आहे.
Jan 5, 2012, 05:30 PM IST'इंदू मिलचा प्रश्न सोडवा'- आठवले
इंदू मिलचा प्रश्न गेले काही दिवस चागंलाच पेटला आहे. आंबेडकर स्मारकासाठी संपूर्ण जमिनीची मागणी ही करण्यात आली आहे. त्याला कालच तत्वत: मान्यता देण्यात आली आहे . इंदू मिलच्या जागेसंदर्भात पंतप्रधानांनी २६ जानेवारीपर्यंत निर्णय घ्यावा, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.
Jan 2, 2012, 03:46 PM ISTआठवलेंची मुस्लिमांना साद
मुस्लिमांनी नेत्यांनी आठवलेंची ऑफर धुडकावल्यानंतर कॉग्रेस राष्ट्रवादीनंही आठवलेंवर तोंडसुख घेतलंय. त्यातच आठवले वारंवार मुस्लीमांना आवाहन करत असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला ऊत आलाय.
Dec 2, 2011, 06:29 PM IST